रितेश देशमुखने करुन दाखवलं; शाहरुख खानचा ‘पठाण’ असतानाही ‘वेड’ चित्रपटाने कमावले इतके कोटी

हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला की मराठी चित्रपटांना थिएटर्स किंवा स्क्रीन्स मिळत नसल्याचा मुद्दा अनेकदा चर्चेचा विषय बनतो. मराठी चित्रपटांना प्राइम टाइम शो आणि स्क्रीन मिळत नसल्याच्या अनेक चर्चा आहेत. शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट रिलीज होण्यापूर्वीही अशाच काहीशा चर्चा होत्या. रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाला शाहरुखच्या चित्रपटाचा फटका बसणार असं बोललं जात होतं. मात्र प्रत्यक्षात काही वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे.
शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 5 दिवसांत या चित्रपटाने जगभरात 500 कोटीहुन अधिक रुपयांची कमाई केली. त्याचवेळी या चित्रपटापूर्वी रितेशचा ‘वेड’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या कमाईत घट होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात वेगळं घडलं आहे.
चित्रपट प्रदर्शित होऊन चार आठवडे उलटून गेले तरी ‘वेड’ची क्रेझ कमी झालेली नाही. ‘वेड’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती रितेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे. या चित्रपटाने चौथ्या आठवड्यात 6 कोटी 11 लाखांची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पाचव्या शुक्रवारी याने 24 लाखांची कमाई केली.
रितेशने शेअर केलेल्या माहितीनुसार, ‘पठाण’चा या चित्रपटावर कोणताही परिणाम झालेला नाही. चित्रपट अजूनही कमाई करत असल्याचे रितेशने आपल्या पोस्टद्वारे सांगितले आहे. आता वेडच्या कमाईत किती वाढ होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
‘पठाण’चाच सगळीकडे बोलबाला असताना रितेशने ‘वेड’च्या बॉक्सऑफिस कलेक्शनबाबत दिलेली माहिती थक्क करणारी आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ७० कोटी ९० लाख रुपये इतपत कमाई केली आहे. तर देशभरात ५८ कोटी ११ लाख रुपये कमावले आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन ३१ दिवस उलटल्यानंतरची ही आकडेवारी आहे.
“अतिशय आनंदी, आभारी, ऋणी” असं रितेशने ही पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे. रितेशने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार ‘पठाण’चा या चित्रपटावर कोणताच परिणाम झाला नसल्याचं दिसून येत आहे. आता ‘वेड’ चित्रपट १०० कोटी रुपयांचा टप्पा पार करणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.
‘वेड’ हा सिनेमा नागा चैतन्य आणि सामंथा यांच्या ‘मजिली’ या तेलुगू सिनेमावर आधारित आहे. वेड जरी रिमेक नसला तरीही रितेश आणि जिनिलियाचा जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. वेड सिनेमात रितेश – जिनिलिया सोबत वेड मध्ये जिया शंकर, अशोक सराफ, विद्याधर जोशी अशा कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुपरस्टार सलमान खानचं विशेष गाणं सिनेमात भाव खाऊन जातं.