बातम्याराजकिय

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने प्रदेशाध्यक्षांना लिहिले रक्ताने पत्र, वाचा काय आहे नेमकं या पत्रात

रक्ताने एखाद्याला पत्र लिहिण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा समोर आलेले आहेत. पण आज चक्क एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने आपल्या नेत्याला डावलल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना रक्ताने पत्र लिहिलं आहे. पैठणमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून गोंधळ झालेला बघायला मिळाला होता. पैठणमधून मा. आमदार संजय वाघचौरे हे राष्ट्रवादीचे प्रमुख दावेदार होते.

पण भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि तिकीट देखील मिळवलं. त्यामुळे या कार्यकर्त्याने नाराजीचे हे पत्र लिहिलं आहे. युवराज चावरे असं या कार्यकर्त्यांचं नाव आहे. हा प्रकार धक्कादायक असून अशी टोकाची भूमिका कोणीही घेऊ नये.

काय आहे नेमकं या पत्रात-

प्रति,
मा. जयंत पाटील साहेब,
प्रदेशाध्यक्ष राकाँपा

विषय- ११० पैठण विधानसभा मतदारसंघात निष्ठावंत संजयभाऊ वाघचौरे यांना डावलल्यामुळे मी पक्षाच्या व त्यांच्या निष्ठेबद्दल स्वतःच्या रक्ताने आपणास स्वतःच्या रक्ताने आपणास पत्र लिहीत आहे.

अर्जदार- युवराज शिवाजीराव चावरे रा.कोळी बोडखा ता.पैठण

महोदय, साहेब ज्या संजय वाघचौरेंनी गेल्या २० वर्षांपासून या पैठण तालुक्यात राष्ट्रवादी जिवंत ठेवली त्यांनाच डावलून पक्षाने काल प्रवेश केलेल्या एकाला उमेदवारी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शिवस्वराज्य असुद्या हल्लाबोल या सारख्या अनेक पक्षाचे कार्यक्रम स्वखर्चातून संजुभाऊंनी घेतले.

तालुक्यात पक्ष वाढीसाठी पायाला भिंगरी लावल्यागत फिरत पक्ष बांधणी केली आणि आज त्यांच्यावर अन्याय झाला. पवार साहेब, अजितदादा व जयंत पाटील साहेब आपल्या शब्दाच्या बाहेर कधीही न गेलेल्या संजय वाघचौरे यांच्यावर हा अन्याय का?

याकरिता हे रक्तरंजित पत्र लिहीत आहे. साहेब अजूनही वेळ गेलेली नाही. लवकरच योग्य तो निर्णय घ्यावा, हि नम्र विनंती. आमच्या पैठण तालुक्यात निष्क्रिय लोकांच्या हातात पक्ष उमेदवारी गेल्यामुळे पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही.

कळावे
राष्ट्रवादीचा कार्यकर्ता

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button