
सध्या Lumpy चा प्रसार झपाट्याने वाढत आहे. हे थांबवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग आटोकाट प्रयत्न करत आहे. पशुसंवर्धन विभागाचे फिरते दवाखानाही गावोगावी जाऊन जनावरांची तपासणी व उपचार करीत आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेसाठी खरेच मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न निर्माण होतो. कारण राज्यात मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत. पण एका ठिकाणी मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याचं चित्र समोर आलं आहे.
गेल्या चार-पाच महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली असून सध्या ते पदावर आहेत. मात्र तरीही उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री असल्याची गोष्ट समोर आली आहे. सध्या लम्पीचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या फिरत्या दवाखान्यातून परिसरातील जनावरांची तपासणी केली जात आहे. मात्र रुग्णालयाच्या या चालत्या वाहनावर उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री अशी प्रतिमा शेतकऱ्यांना पाहायला मिळते. सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत.
खरे तर कोणत्याही प्राधिकरणात बदल झाला की लगेचच सर्व विभागांमध्ये बदल होतो. अनेक उदाहरणे देता येतील. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे पशुसंवर्धन विभागाच्या फिरत्या रुग्णालयाच्या वाहनावर आजही ठाकरे यांचीच मुख्यमंत्री अशी प्रतिमा आहे.
बदल कोण करणार?
फिरत्या दवाखान्यासाठी दिलेल्या या गाड्या सरकारने दिल्या आहेत. या गाड्या दिल्या तेव्हा त्यावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे चित्र लावण्यात आले होते. नेतृत्वात बदल झाला तरी ही प्रतिमा कोण बदलणार? असे प्रश्न पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी खाजगीत विचारताना दिसतात.
राज्यात 72 फिरते दवाखाने
जनावरांच्या उपचारासाठी फिरते दवाखाना ही संकल्पना पुढे आली. यासाठी राज्य सरकारने 72 गाड्या खरेदी करून फिरत्या हॉस्पिटलमध्ये रूपांतरित केले. त्यामध्ये सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. मात्र केवळ कराड्यातच नव्हे, तर राज्यातील या सर्व गाड्यांवर उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री अशी प्रतिमा असल्याचे पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांकडून आजही खासगीत बोलले जाते.
सध्या लंम्पीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मुळे पशुसंवर्धन विभागाकडे शासनाचे विशेष लक्ष आहे. लम्पीला आवर घालण्यासाठी फिरत्या दवाखान्याची गरज वाटू लागली आहे. प्रत्येक तालुक्याला हा फिरता दवाखाना देण्याची धोरण दिसते त्यामुळे अजून फिरते दवाखाने वाढणार असल्याचेही चर्चा आहे.
“फिरते रुग्णालयाची संकल्पना आल्यावर सरकारने या गाड्या विकत घेऊन जिल्हास्तरावर पाठवल्या.आमच्या सातारा जिल्ह्याला 3 गाड्या मिळाल्या.त्यावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांची प्रतिमाही फिक्स केली. आम्हा अधिकाऱ्यांचा त्यामध्ये कोणताही सहभाग किंवा हेतू नाही. लोकमतने ही बाब लक्षात आणून दिली आहे. याबाबत वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागून योग्य ती कार्यवाही करू,” असे अंकुश परिहार (उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन विभाग) यांनी सांगितले.