Breaking News
Home / बातम्या / राज्यातील ‘या ९’ ठिकाणी झाली लॉकडाऊनची घोषणा, मंत्र्यांनी केली घोषणा

राज्यातील ‘या ९’ ठिकाणी झाली लॉकडाऊनची घोषणा, मंत्र्यांनी केली घोषणा

देशातील अनेक राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. खासकरून महाराष्ट्र आणि केरळमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

मागील ३ दिवसात कोरोनाची रुग्णसंख्या लक्षणीय वाढली आहे. राज्य सरकारने खबरदारीची पावले उचलायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी निर्बंध घालण्यात आले आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

विदर्भात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. अमरावती आणि अकोला जिल्ह्यात २ दिवस संचारबंदी देखील लागू करण्यात आली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आता आणखी ५ ठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

अमरावती, अकोला महापालिका आणि अचलपूर, अकोट व मूर्तिजापूर नगरपरिषद हद्दीत सोमवारी रात्री ८ वाजेपासून पुन्हा सात दिवस ‘लॉकडाऊन’चा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अमरावतीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी हि घोषणा केली.

तर अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर तालुक्यांसाठी लाॅकडाऊनचे वेगळे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढले आहेत.

उपहारगृहे, हॉटेलने पार्सल सुविधेसाठी परवानगी राहील. लग्न समारंभाकरिता वधू व वरपक्षासह २५ व्यक्तींना परवानगी राहील. मालवाहतुकीसाठी कुठलेही निर्बंध राहणार नाहीत. भाजी मंडई पहाटे ३ ते ६ सुरू राहील.

पुण्यातही अनेक निर्बंध-

पुण्यात रात्री ११ ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरात सोमवारपासून रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

रात्री ११ नंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसंच, शाळा आणि महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहे. तसंच, खासगी कोचिंग क्लासला दिलेली परवानगी रद्द केली आहे.

हॉटेल बा रला रात्री उशिरापर्यंत दिलेली परवानगी आता रद्द करण्यात आली असून हॉटेल आणि बा र रात्री ११ वाजता बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लग्न समारंभ, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवर पुन्हा निर्बंध आणण्यात आले आहेत. कार्यक्रमांसाठी २०० जणांना परवानगी देण्यात आली असून त्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *