Breaking News
Home / बातम्या / राज्यातील आजचा कोरोना रुग्णांचा आकडा चिंतेत भर घालणारा आहे!

राज्यातील आजचा कोरोना रुग्णांचा आकडा चिंतेत भर घालणारा आहे!

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे सध्या चित्र आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लावले आहेत. तर अनेक ठिकाणी काही दिवसांसाठी लॉकडाऊन देखील लावण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासन सतर्क झाले आहे.

मागील महिनाभरात कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याचे दिसत होते. कोरोना रुग्णांची वाढती संख्या देखील नियंत्रणात होती. पण मागील ७-८ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान आज आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येने चिं ता अजून वाढवली आहे. राज्यात आज दिवसभरात तब्बल ८८०७ रुग्णांची वाढ झाली आहे. हा आकडा मागील महिनाभरातील रुग्णाच्या संख्येत खूप जास्त आहे. आज २७७२ रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट देखील खूप चांगला होता. तो देखील आता कमी झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यावरून ९४.७० वर आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून हि माहिती दिली आहे.

राज्यात लावण्यात आले अनेक निर्बंध-

कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऍ क्शन मोडमध्ये आले असून त्यांनी बैठक घेत विविध सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील प्रत्येक जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत.

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करत दंड वसूल केला जात आहे. याशिवाय सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असून शाळा देखील बंद ठेवण्याचे आदेश दिले गेलेत.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *