Breaking News
Home / बातम्या / या खेळाडूवर लागली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली! मिळाले ‘एवढे’ कोटी रुपये..

या खेळाडूवर लागली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली! मिळाले ‘एवढे’ कोटी रुपये..

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४ व्या पर्वासाठी सध्या ऑक्शन सुरु आहे. या ऑक्शनसाठी अंतिम २९२ खेळाडूंची यादी जाहीर झाली होती. आता आयपीएल २०२१च्या मिनी ऑक्शनसाठीच्या ६१ रिक्त जागांसाठी २९२ खेळाडू शर्यतीत आहेत आणि फ्रँचायझीच्या पर्समध्ये १९६.६ कोटी आहेत. आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनसाठी १११४ खेळाडूंनी नाव नोंदवली होती.

दरम्यान आजच्या ऑक्शन मध्ये दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसनं रेकॉर्ड किंमत मिळवत आयपीएलच्या इतिहासात विक्रम केला आहे. आयपीएलच्या इतिहासातील हि सर्वात मोठी बोली ठरली आहे; तब्बल १६.२५ कोटींच्या बोलीसह राजस्थान रॉयल्स संघात दाखल ख्रिस मॉरिस दाखल झाला आहे.

मागील वर्षी पॅट कमिन्स हा लिलाव प्रक्रियेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. कोलकाता नाईट रायडर्स टीमने आयपीएलच्या बाराव्या सीजनमध्ये ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिंस याला १५.५ कोटीला खरेदी केलं होतं. कमिंस मागील वेळी आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू बनला होता.

दरम्यान युवराज सिंग हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग खेळाडू होता. युवराजवर १६ कोटींची बोली लागली होती. याशिवाय कोहलीला देखील बंगलोरने १७ कोटीला रिटेन केले होते. तो देखील महागडा खेळाडू ठरला होता. पण बोली मात्र १६ कोटी हि सर्वात जास्त ठरली होती.

आजच्या लिलावात ग्लेन मॅक्सवेल हा दुसरा महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला घेण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये चढाओढ दिसली. ग्लेन मॅक्सवेल तब्बल १४.२५ कोटींच्या बोलीसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात दाखल झाला आहे.

याशिवाय इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोइन अली ७ कोटींच्या बोलीसह चेन्नई सुपरकिंग्ज संघात दाखल झाला आहे. तर बांगलादेशचा खेळाडू शाकिब अल हसन ३ कोटी २० लाखांच्या बोलीसह कोलकाता नाइट रायडर्स संघात दाखल झाला आहे.

भारताचा युवा अष्टपैलु खेळाडू शिवम दुबे हा ४.४ कोटींच्या बोलीसह राजस्थान रॉयल्स संघात दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ हा २.२० कोटींच्या बोलीसह दिल्ली कॅपिटल्सच्या संघात दाखल झाला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच, करुण नायर, अॅलेक्स हे ल्स आणि जेसन रॉय अनसोल्ड राहिले आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *