सध्या पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मागील २ दिवसात यात वाढ झाली नसली तरी आधीच ते गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सध्या सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. केंद्र सरकारला रोषाचा सामना करावा लागत आहे.
पेट्रोलच्या किमतींनी तर देशात अनेक ठिकाणी शंभरी गाठली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती तर जास्त वाढल्या नाहीत मग पेट्रोल डिझेलचे भाव का वाढत आहेत हा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावर भाष्य करताना इंधन दरवाढीमागचे कारण सांगितले आहे. त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचं उत्पादन कमी करण्यात आलं आहे. जे देश हा पुरवठा करतात त्यांनी अधिक नफा मिळवण्यासाठी उत्पादन कमी केलं आहे. त्यामुळे ग्राहक असलेल्या देशांना सम स्यांचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय कोरोनाची साथ देखील दरवाढीस जबाबदार असल्याचे त्यांचं म्हणणं आहे. याशिवाय राज्य आणि केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात कर पेट्रोल आणि डिझेलमधून मिळते. तो कर देखील विकासकामांसाठी गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
राज्य आणि केंद्र सरकारने विकासकामांवर होणार खर्च वाढवला आहे. त्यामुळे रोजगार देखील वाढणार आहे. मागील वेळच्या अर्थसंकल्पापेक्षा यावेळी ३४ टक्के अधिक रक्कम खर्च केली जाणार असल्याचे ते बोलले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.