मंदिराच्या दानपेटीत वापरलेले कंडोम फेकल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी एका विकृतीला अटक केली आहे. देवदास देसाई असे आरोपीचे नाव आहे. येशूचा संदेश पसरवण्यासाठी आपण हे केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. या कृत्याबद्दल आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या एक वर्षापासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. वापरलेला कंडोम मंदिराच्या दानपेटीत टाकून तो पळून जायचा.
62 वर्षीय आरोपी देवदास देसाई याने मंगळुरूमधील अनेक मंदिरांमध्ये जाऊन असे कृत्य केले आहे. पोलीस बराच काळ त्याचा शोध घेत होते. पण तो पोलिसांपासून नेहमीच फरार होत होता. गतवर्षी २७ डिसेंबर रोजी कोरजना कट्टे गावातील एका मंदिरातील दानपेटीत वापरलेला कंडोम सापडला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, तो अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.
अशा घटनेनंतर पोलिसांनी मंदिर आणि परिसरात लावलेले कॅमेरे तपासले. अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात आरोपीचा चेहरा दिसत होता. त्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत देवदास देसाईने अशाप्रकारे अनेक मंदिरांची विटंबना केल्याची कबुली दिली होती. एकूण 18 मंदिरांमध्ये असे विकृत कृत्य केल्याचे आरोपीने सांगितले. मात्र, यापैकी केवळ पाच मंदिरांच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या जबाबात म्हटले आहे की, तो मंदिरांमध्ये कंडोम टाकत असे जेणेकरून ते अशुद्ध होईल आणि लोक त्याच्या धर्माकडे आकर्षित होतील. त्याने केवळ मंदिरातच नाही तर मशिदी आणि गुरुद्वारांमध्येही अशा प्रकारे कंडोम फेकले होते. दरम्यान, आरोपीला या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही. तो म्हणाला की तो फक्त येशूच्या वचनाचा प्रचार करत होता. आरोपीच्या म्हणण्यानुसार, बायबलमध्ये येशूशिवाय कोणीही देव नाही असे म्हटले आहे. “मी मंदिरांमध्ये कंडोम टाकायचो कारण अशुद्ध वस्तू ह्या अपवित्र ठिकाणीच टाकाव्यात” असं तो म्हणाला.