Breaking News
Home / बातम्या / …म्हणून आमदाराने कार्यकर्त्यांना भेट दिल्या चांदीच्या चपला आणि पॅशन बाईक!

…म्हणून आमदाराने कार्यकर्त्यांना भेट दिल्या चांदीच्या चपला आणि पॅशन बाईक!

राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते हे प्रेम महाराष्ट्राला आणि किंबहुना देशाला नवीन नाहीये. देशात राजकीय कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी कधीही हजर असतात. एवढेच नाही तर काही कार्यकर्ते काहीहि करायला तयार असतात. अनेकदा आपला नेता आमदार खासदार, मंत्री व्हावा यासाठी कार्यकर्त्यांनी वेगवेगळे उपवास, पण केलेले आपण पाहिले आहे.

असाच एक पण काही कार्यकर्त्यानी केला होता. या नेत्याने त्या कार्यकर्त्यांचा ज्याप्रमाणे सन्मान केला आहे ते बघून त्याचे सध्या कौतुक होत आहे. हे नेते आहेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर. गोपीचंद पडळकर जोपर्यंत आमदार होणार नाहीत तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता.

दोघांनी केला होता चप्पल न घालण्याचा निर्णय-

गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते दत्तात्रय कटरे यांनी २००६ पासून पायात चप्पलच घातली नव्हती. गोपीचंद पडळकर हे जेव्हा आमदार होतील तेव्हाच चप्पल घालणार असा पण त्यांनी केला होता. तर दुसरे कार्यकर्ते नारायण पुजारी यांनी देखील २०११ पासून पायात चप्पल घातली नव्हती.

गोपीचंद पडळकर यांच्यावर या कार्यकर्त्यांचं असलेलं प्रेम पाहून त्यांनी त्यांचा मोठा सन्मान केला आहे. गोपीचंद पडळकर हे २०१९ ची विधानसभा निवडणूक बारामतीतून लढणे. त्यांना तिथे मोठा पराभव सहन करावा लागला. पण भाजपने त्यांना विधानपरिषदेवर घेतलं. त्यामुळे या कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण झाली.

गोपीचंद पडळकर यांनी कटरे आणि पुजारी या २ कार्यकर्त्यांना चांदीची चप्पल आणि पॅशन गाडी देऊन त्यांचा सन्मान केला आहे. तर त्यांचे दुसरे एक कार्यकर्ते जालिंदर क्षीरसागर यांनी देखील एक पण केला होता. जोपर्यंत पडळकर आमदार होत नाहीत तोपर्यंत मोफत दाढी कटिंग करण्याचा त्यांचा पण होता.

जालिंदर क्षीरसागर यांच्या वारसांना देखील पॅशन गाडी यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपचे आमदार जयकुमार गोरे आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत हे देखील उपस्थित होते. जयकुमार गोरे यांचं भाषण सुरु असताना पडळकर यांना कार्यकर्त्यांचे हे प्रेम पाहून अश्रू अनावर झाले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *