Breaking News
Home / बातम्या / मोदी सरकारची जबरदस्त योजना, पती-पत्नीला घरबसल्या मिळणार 10 हजार रुपये

मोदी सरकारची जबरदस्त योजना, पती-पत्नीला घरबसल्या मिळणार 10 हजार रुपये

म्हातारपणी पैशाची खूप गरज असते. या वयात नीट काम करणेही शक्य होत नाही. अशा परिस्थितीत दरमहा पेन्शन किंवा पैसे मिळाले तर चांगलेच असते. खाजगी नोकऱ्यांमध्ये पेन्शन मिळत नाही. आता सरकारी नोकऱ्यांमध्येही पेन्शनची व्यवस्था जवळपास संपली आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला मोदी सरकारची एक अशी योजना सांगणार आहोत, ज्याचा फायदा घेऊन पती-पत्नीला दरमहा 10 हजार रुपये मिळू शकतात.

पती-पत्नीला होणार या योजनेचा फायदा

सरकारच्या अटल पेन्शन योजनेचा खूप उपयोग होतो. याच्या मदतीने तुम्ही तारुण्यात कमी गुंतवणूक करून वृद्धापकाळात अधिक फायदे मिळवू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला वृद्धापकाळात खात्रीशीर पेन्शन मिळते. पती-पत्नी दोघेही या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेत जोडप्याने स्वतंत्रपणे गुंतवणूक केल्यास वृद्धापकाळात तुम्हाला दरमहा १० हजार रुपये मिळू शकतात. सध्या अटल पेन्शन योजनेअंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर मासिक 1000 ते 5000 रुपये पेन्शनची हमी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे.

इतके पैसे गुंतवावे लागतील

या योजनेत तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवावी लागेल. तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर अवलंबून, तुम्हाला निवृत्तीनंतर 1 हजार ते 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळेल. तुम्ही ६० वर्षांचे झाल्यावर तुम्हाला ही पेन्शन मिळू लागेल. जर तुम्हाला दरमहा 5000 रुपये म्हणजेच वार्षिक 60,000 रुपये पेन्शन हवे असेल तर तुम्हाला दर 6 महिन्यांनी फक्त 1239 रुपये गुंतवावे लागतील.

जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षापासून या योजनेत सामील झालात तर तुम्हाला 5000 रुपये मासिक पेन्शन मिळण्यासाठी दरमहा 210 रुपये द्यावे लागतील. जर तीन महिन्यांला पैसे भरायचे असतील तर ही रक्कम 626 रुपये आणि सहा महिन्याचे 1,239 रुपये भरावे लागतील. दुसरीकडे, दरमहा 1,000 रुपये पेन्शन मिळविण्यासाठी, तुम्हाला 42 रुपयांची मासिक गुंतवणूक करावी लागेल.

जर तुम्ही वयाच्या 35 व्या वर्षापासून या योजनेत सामील झालात तर दरमहा 5 हजार पेन्शनसाठी तुम्हाला 25 वर्षे दर 6 महिन्यांनी 5,323 रुपये जमा करावे लागतील. म्हणजे तुमची एकूण गुंतवणूक 2.66 लाख रुपये असेल. या आधारावर तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षी 5000 रुपये मासिक पेन्शन मिळेल. दुसरीकडे, तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी सामील झाल्यास, तुमची एकूण गुंतवणूक फक्त 1.04 लाख रुपये असेल. याचा सरळ अर्थ असा की तुम्ही जितक्या कमी वयात या योजनेत सामील होतील तितके जास्त फायदे तुम्हाला मिळतील.

योजनेतील इतर महत्त्वाचे मुद्दे

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, तुम्ही मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक पेमेंट योजना निवडू शकता. चांगली गोष्ट म्हणजे आयकराच्या कलम 80CCD अंतर्गत त्यातही कर सूट देण्यात आली आहे. तुम्ही एका सदस्याच्या नावाने एकच खाते उघडू शकता. जर सदस्याचा मृत्यू ६० च्या आधी किंवा नंतर झाला तर ही पेन्शन रक्कम त्याच्या पत्नीला मिळते. त्याच वेळी, सदस्य आणि पत्नी दोघांच्या मृत्यूनंतर, नामांकित व्यक्तीला ही पेन्शन दिली जाते.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published.