Breaking News
Home / बातम्या / मोदी सरकारचा पुन्हा खासगीकरणाचा घाट; विकणार ‘ही’ मोठी कंपनी

मोदी सरकारचा पुन्हा खासगीकरणाचा घाट; विकणार ‘ही’ मोठी कंपनी

भारतात २०१४ साली मोठा राजकीय बदल घडून आला आणि भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच मोदींचे केंद्रात सरकार आले. मोदी सरकार आल्यापासून भारतात अनेक बदल झाले आहेत आणि काही ऐतिहासिक निर्णय देखील घेण्यात आले आहेत. यामध्ये उत्तप्रदेशातील प्रभू श्रीरामजन्मभूमीचा निर्णय असो किंवा काश्मीरचे कलम हटवणे असो.

मोदी सरकारच्या या निर्णयांची वाहवा झाली मात्र मोदी खासगीकरण करत आहेत असा आरोप देखील मोदींवर होत आहे. अशातच आता मोदी सरकारने आणखी एक सरकारी कंपनी विकण्याची तयारी सुरु केली आहे. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे १००% भागभांडवल आणि व्यवस्थापनाचे नियंत्रण हस्तांतरित करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.

सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत्यामधील कंपनी आहे. उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातील साहिबाबादमध्ये सेंट्रल सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे ठिकठिकणी युनिट्स आहेत. या कंपनीमध्ये सोलर फोटोव्होल्टाईकस, फेरिट्स आणि पिझो सिरॅमिक्स सारखे पार्ट तयार होतात. या कंपनीची सुरुवात १९७७ साली करण्यात आली आहे.

केंद्र सरकार सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचा संपूर्ण सरकारी हिस्सा विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. केंद्र सरकारच्या अटींनुसार कंपनी खरेदी करणाऱ्या कंपनीची मर्यादा मार्च २०१९ पर्यंत किमान ५० कोटींची संपत्ती असणं आवश्यक आहे. तसेच कंपनी खरेदी करणाऱ्या व्यवस्थापकास पुढील तीन वर्षे कंपनीतील समभाग विकण्यास मनाई असणार आहे.

दरम्यान , मागील वर्षांपासून केंद्र सरकार विविध शासकीय संस्था तसेच कंपन्यांमधील गुंतवणूक निर्गुंतवणूकवर भर देताना दिसत आहे . निर्गुंतवणूकीमधून केंद्र सरकारला मिळालेल्या पैश्यातून केंद्र सरकार देशातील विविध योजनांवर खर्च करणार असल्याचं सांगितलं जातंय.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published.