Breaking News
Loading...
Home / बातम्या / मोदी अमेरिकेला गेलेल्या या विशेष विमानाबद्दल माहिती आहे का? अनेक खास गोष्टी, किंमत तर..

मोदी अमेरिकेला गेलेल्या या विशेष विमानाबद्दल माहिती आहे का? अनेक खास गोष्टी, किंमत तर..

जगभरात एखाद्या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष जेव्हा इतर देशांचा दौरा करतात तेव्हा ते विशेष विमानाने प्रवास करतात. सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ‘एअर इंडिया वन’ या विमानातून प्रवास करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले आहेत आणि त्यांनी हेच हायटेक विमान प्रवासासाठी वापरले आहे.

पंतप्रधान मोदी यांचे अमेरिका दौऱ्याचे मुख्य कारण म्हणजे वाशिंग्टन मधील QUAD परिषद आणि न्यूयॉर्कमधील UNGC परिषद. पंतप्रधान दोन्ही परिषदांमध्ये बोलणार आहेत. अनेकांना मोदी प्रवास करत असलेल्या विमानाबद्दल आकर्षण आहे. तर मित्रांनो आपण आजच्या लेखामध्ये मोदी प्रवास करत असलेल्या विमानातील विशेष गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

Loading...

‘एअर इंडिया वन’ हे विमान नॉन-स्टॉप उड्डाण घेण्यास सक्षम आहे. आतापर्यंत जितके भारतीय पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत त्यांच्या विमानाला फ्रँकफर्टमधे आराम घ्यावा लागायचा मात्र आताच्या ‘एअर इंडिया वन’ मध्ये कुठेच थांबा घेण्याची गरज भासत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न थांबता या विमानातून वाशिंग्टनला गेले आहेत.

‘एअर इंडिया वन’ला अत्यंत आकर्षक असा लूक देण्यात आला आहे. बाहेरील बाजूस एका बाजूला विमानावर अशोक चिन्ह बनवलेले आहे. दुसऱ्या बाजूला दरवाजावर हिंदीमध्ये ‘भारत’ तर दुसऱ्या बाजूला इंग्रजीमध्ये ‘INDIA’ असे लिहलेले आहे. खालील बाजूस एक भारतीचा राष्ट्रीय ध्व्ज देखील आहे.

‘एअर इंडिया वन’ विमानाच्या आत एक कॉन्फरन्स रूम आहे. व्हीआयपी प्रवाशांसाठी एक केबिन, आपत्कालीन वैद्यकीय केंद्र तसेच इतर मान्यवर आणि कर्मचाऱ्यांसाठी जागा आहेत. ‘एअर इंडिया वन’ची एक कमालीची खासियत म्हणजे एकदा इंधन भरले की हे विमान १७ तास सतत उड्डाण करू शकतं.

Loading...

‘एअर इंडिया वन’ विमानात ऍडव्हान्स इलेक्ट्रॉनिक वायफेअर सूट आहे जो फक्त विमानाला इतर हल्ल्यांपासून वाचवत नाही तर प्रत्युत्तर देण्यासही सक्षम आहे. याशिवाय विमानात सेल्फ प्रोटेक्शन सूट असल्यामुळे शत्रूंचे सिग्नल जॅम करण्यासह क्षेपणास्त्रांची दिशाही बदलू शकते. या विमानाची किंमत तर ५ हजार कोटींच्या घरात आहे.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *