Breaking News
Home / बातम्या / मेगा ऑक्शन मध्ये प्लेयर खरेदी करण्यासाठी कोणत्या संघाकडे किती कोटी शिल्लक राहिले जाणून घ्या

मेगा ऑक्शन मध्ये प्लेयर खरेदी करण्यासाठी कोणत्या संघाकडे किती कोटी शिल्लक राहिले जाणून घ्या

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या पुढील पर्वाची आठ फ्रँचायझींनी त्यांचे खेळाडू कायम ठेवलेले खेळाडू जाहीर केले आहेत. लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, डेव्हिड वॉर्नर, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, राशिद खान, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो ही काही मोठी नावे आहेत जी कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीतून गायब झाली आहेत. त्यामुळे आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात त्यापैकी एक खेळाडू मोठा पैसा कमावेल यात शंका नाही. पण, या 8 फ्रँचायझींकडे या खेळाडूंना त्यांच्या संघात आणण्यासाठी एवढा पैसा शिल्लक आहे का? हे जाणून घेऊया.

पंजाब किंग्जने फक्त दोन खेळाडूंना कायम ठेवले, तर सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने प्रत्येकी तीन आणि चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने प्रत्येकी चार खेळाडूंना कायम ठेवले. आज एकूण 27 खेळाडूंना कायम ठेवण्यात आले असून, रवींद्र जडेजा, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत हे 16-16 कोटी रुपये खर्चून सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत.

बीसीसीआयने प्रत्येक फ्रँचायझीला 90 कोटी रुपयांची पर्स दिली आहे आणि त्यांना त्यात एक संघ बनवायचा आहे. यातून कायम ठेवलेल्या खेळाडूंची रक्कम वजा केली जाईल. कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक आहेत ते जाणून घेऊया…

पंजाब किंग्स – मयंक अग्रवाल (14 कोटी), अर्शदीप सिंग (4 कोटी); शिल्लक – 72 कोटी

सनरायझर्स हैदराबाद – केन विल्यमसन (14 कोटी), अब्दुल समद (4 कोटी), उमरान मलिक (4 कोटी); शिल्लक – 68 कोटी

राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन (14 कोटी), जोस बटलर (10 कोटी), यशस्वी जैस्वाल (4 कोटी); शिल्लक – 62 कोटी

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी), मोहम्मद सिराज (7 कोटी); शिल्लक – 57 कोटी

चेन्नई सुपर किंग्ज – रवींद्र जडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी) ; शिल्लक – 48 कोटी

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), किरॉन पोलार्ड (6 कोटी); शिल्लक – 48 कोटी

कोलकाता नाइट रायडर्स – आंद्रे रसेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), व्यंकटेश अय्यर (8 कोटी), सुनील नरेन (6 कोटी); शिल्लक – 48 कोटी

दिल्ली कॅपिटल्स – ऋषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.5 कोटी), एनरिक नॉर्टजे (6.5 कोटी); शिल्लक – 47.5 कोटी

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published.