मुलाच्या मृत्यूनंतर 70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षीय सुनेशी केलं लग्न; कारण वाचून म्हणाल हसावं का रडावं

उत्तर प्रदेशातील एका मंदिरात एका 70 वर्षीय व्यक्तीने आपल्या 28 वर्षीय सुनेशी लग्न केले. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. सासरे कैलाश यादव यांच्या पत्नीचे १२ वर्षांपूर्वी निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना चार मुले होती आणि पूजाचा नवरा तिसरा मुलगा होता, त्याचाही मृत्यू झाला आहे.
रिपोर्ट्सनुसार, दोघांनी परस्पर संमतीने लग्न केले आहे आणि पूजा तिच्या नवीन नात्यामुळे खूश आहे. कैलाश यादव हे बहलगंज कोतवाली भागातील छपिया उमराव गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. बरहलगंज पोलीस स्टेशनचे चौकीदार कैलाश यादव यांनी त्यांची सून पूजासह सप्तपदी घेतल्या आणि यावेळी गावकऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या विवाहाबाबत परिसरात चर्चा सुरू आहे.
पतीच्या निधनानंतर पूजा एकाकी पडल्याचे काहींचे म्हणणे आहे. तिचे लग्न दुसर्याशी झाले होते, पण तिला घर आवडत नव्हते म्हणून ती तिच्या नवऱ्याच्या घरी परतली. सासरच्या मंडळींनी लग्नाला होकार दिला आणि समाजाची पर्वा न करता विवाह पार पडला. सोशल मीडियाच्या माध्यमातून बधलगंज पोलीस ठाण्याचे चौकीदार कैलाश यादव यांच्या लग्नाची बातमी गावात आणि पोलीस ठाण्यात पोहोचली आहे.
अधिका-यांनी सांगितले की, आम्हाला या लग्नाची माहिती व्हायरल होत असलेल्या फोटोवरूनच मिळाली. याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. ते म्हणाले की, हा दोन लोकांचा परस्पर संबंध आहे, कोणाची तक्रार असेल तर पोलीस तपास करू शकतात. सध्या या लग्नाची तुफान चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
तिसऱ्या मुलाच्या मृत्यूनंतर सून विधवा झाली होती
कैलासच्या 4 मुलांपैकी तिसरी सून पतीच्या मृत्यूनंतर आपले जीवन इतरत्र घालवणार होती. पण तेवढ्यात सासर्याला सून आवडली. यानंतर वय आणि समाजाचे बंधन तोडून दोघांनी मंदिरात जाऊन एकमेकांसोबत सात फेरे घेतले. दोघांनी परस्पर संमतीने लग्न केल्याचे समजते. या विवाहाबाबत पोलिस किंवा प्रशासन स्तरावर कोणत्याही पक्षाच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. दरम्यान सुनेसोबत लग्न करण्याचं कारण म्हणजे मुलाच्या मृत्यूनंतर तीच दुसरीकडे लग्न लावून देऊनही ती खुश नव्हती. त्यामुळे सासर्याने तिच्या भविष्याचा विचार करून तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
एक गोष्ट अशीही समोर येत आहे की, मुलाच्या मृत्यूनंतर वृद्ध सासरच्यांनी सुनेची दुसऱ्या ठिकाणी लग्न करून दिले होते. पण तिचं तिथं पटलं नाही आणि ती तिथे फारशी राहिली नाही. नंतर ती पहिल्या सासरी आली. यानंतर सासऱ्यानेच भविष्याचा विचार करून सुनेला पत्नी बनवण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या संमतीने मंदिरात जाऊन लग्न केले.