Breaking News
Home / नवीन खासरे / मुंबईत फिरायचा प्लॅन करताय? या ५ धार्मिक स्थळांना नक्की द्या भेट..

मुंबईत फिरायचा प्लॅन करताय? या ५ धार्मिक स्थळांना नक्की द्या भेट..

मुंबईला मायानगरी म्हणून ओळखले जाते. मुंबईची ओळख आज जगभरात पोहचलेली आहे. मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हणून देखील ओळखले जाते. मुंबईत अनेक पर्यटन स्थळ आहेत ज्यांचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व खूप मोठे आहे. दरवर्षी जगभरातील पर्यटक मुंबईत पर्यटनाला येत असतात.

जर तुम्हीही मुंबईत फिरायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही मुंबईत प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांसोबत काही धार्मिक स्थळांना देखील भेट देऊ शकता. मुंबईत असलेले हे धार्मिक स्थळ ऐतिहासिक आहेत. जाणून घेऊया कोणते आहेत हे धार्मिक स्थळ-

सिद्धिविनायक मंदिर-

मुंबईच्या प्रभादेवी मध्ये सिद्धिविनायक मंदिर आहे. गणपती बाप्पाची मूर्ती या मंदिरात स्थापन करण्यात आलेली आहे. या मंदिराची स्थापना १८०१ मध्ये झाली होती. मंदिरात प्रत्येक मंगळवारी तर भाविकांची मोठी गर्दी असते. ऐतिहासिक पुरातन असलेल्या या मंदिरास तुम्ही मुंबईत गेल्यावर नक्कीच भेट द्यायला हवी.

बाबुलनाथ मंदिर-

बाबुलनाथ मंदिर हे महादेवाचे मंदिर आहे. मुंबईच्या मलबार परिसरात हे मंदिर आहे. बाबुलनाथ मंदिरावर मारवाडी आणि गुजराती समाजाच्या लोकांची खूप श्रद्धा आहे. हे मंदिर हुबेहूब कैलास पर्वतासारखे आहे.

वाळकेश्वर मंदिर-

असे म्हंटले जाते कि येथे श्री रामाने वाळूपासून शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली होती. वाळकेश्वरचा अर्थ देखील महादेव होतो. या मंदिरात भारतीय क्लासिकल म्युजिक फेस्टिव्हल देखील आयोजित केले जाते. वाळकेश्वर मंदिर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर दक्षिण मुंबईतील मलबार हिलच्या वाळकेश्वर भागात स्थित आहे. १६व्या शतकातील पोर्तुगीज राजवटीने हे मंदिर पाडून टाकले परंतु १७१५ साली राम कामत नावाच्या श्रीमंत इसमाच्या औदार्यामुळे हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले.

मुंबा देवी-

हे मंदिर मुंबईतील सर्वात प्राचीन मंदिरापैकी एक आहे. या मुंबा देवीच्या नावावरूनच मुंबईचं नाव ठेवण्यात आलं आहे. हे मंदिर भुलेश्वर येथे आहे. हे मंदिर जवळपास ४०० वर्ष जून आहे. मुंबईत सुरुवातील मासेमारी करणाऱ्या लोकांची वस्ती होती. कोळी लोक येथे लोक जास्त राहायचे. त्यांनी बोरी बंदर मध्ये मुंबा आईचं मंदिर स्थापन केलं.

महालक्ष्मी मंदिर-

हे मंदिर देखील सर्वात पुरातन मंदिरांपैकि एक आहे. १८०१ मध्ये मंदिराची स्थापना झाली होती. मंदिरात दुर्गा, सरस्वरीं आणि लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. एका हिंदू उद्योजकाने हे मंदिर त्याकाळी बांधलं होतं असं मानलं जातं. येथून समुद्राचं मनमोहक रूप देखील आपल्याला बघायला मिळतं. नवरात्रीत येथे भाविकांची खूप गर्दी असते.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *