Breaking News
Loading...
Home / मनोरंजन / मुंबईच्या सायलीला मागे टाकून पवनदीप राजन ठरला इंडियन आयडॉल १२ चा विजेता

मुंबईच्या सायलीला मागे टाकून पवनदीप राजन ठरला इंडियन आयडॉल १२ चा विजेता

सध्या टीव्ही क्षेत्रात संगीतकलेशी निगडित सर्वात लोकप्रिय असणाऱ्या इंडियन आयडॉलच्या १२व्या सीझनचा शेवट होणार आहे. इंडियन आयडॉलने आतापर्यंत संगीत क्षेत्राला अनेक गायक दिले आहेत. अरिजित सिंग, नेहा कक्कर, शान यांसारखे गायक इंडियन आयडलद्वारे चर्चेत आले होते आणि आता संगीत क्षेत्रात लोकप्रिय आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार इंडियन आयडॉलच्या १२ व्या सीझनचा शेवटचा एपिसोड म्हणजेच ग्रँड फिनाले चित्रित करण्यात आलेला आहे. आपल्या आवडत्या गायकाला जिंकून देण्यासाठी अनेकांनी सोशल मीडियाद्वारे आपले मत दिले होते. लोकांना इंडियन आयडॉल १२ चा विजेता कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. यावेळी ही ट्रॉफी पवनदीप राजनने जिंकली आहे. त्याला एक आलिशान कार आणि २५ लाख रुपये बक्षीसही मिळाले आहे

Loading...

पवनदीप राजन सुरुवातीपासूनच इंडियन आयडलच्या संगीत क्षेत्रातील कलाकारांचा म्हणजेच जज असणाऱ्या गायकांचा आवडता होता. सोशल मीडिया आणि यूट्यूबला पवनदीपचे “फिर से उड चला” हे गाणे अत्यंत व्हायरल झाले होते. पवनदीपने सुरवातीपासूनच एका पेक्षा एक असे धमाकेदार प्रदर्शन इंडियन आयडॉल १२मध्ये केले होते.

पवनदीप फक्त गायनच करत नाही तर तो वादक देखील आहे. त्याला वाद्येही वाजवता येतात. त्याच्यातील ही सगळी कौश्यले पाहून संगीत क्षेत्रातील दिग्ज बप्पी लाहिरी यांनी त्याला एक तबला भेट स्वरूपात दिला आहे.

पवनदीप राजन यांचा जन्म २७ जुलै १९९६ रोजी चंपावत, उत्तराखंड येथे झाला. त्याचे वडील सुरेश राजन देखील गायक आहेत, जे उत्तराखंडच्या स्थानिक कार्यक्रमांमध्ये आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये काम करतात . त्याला दोन बहिणी देखील आहेत ज्यांना इंडियन आयडॉल १२च्या मंचावर पाहण्यात आले होते.

Loading...

कॉलेजच्या दिवसांत पवनदीप युवा महोत्सवात सहभागी व्हायचा. तो सणांमध्ये गाणी आणि वाद्ये वाजवत असे.अशातच त्याला द व्हॉईस इंडिया शोबद्दल माहिती मिळाली. त्याने शोचे ऑडिशन दिले आणि शोला गेला. त्यावेळची त्याची हेअरस्टाईलही पाहण्यासारखी होती. २०१५ मध्ये, पवनदीप द व्हॉइस इंडिया शोचा विजेता बनला आणि ट्रॉफीसह 50 लाख रुपयांचे बक्षीस जिंकले. यासोबत त्याला अल्टो के १० कारही मिळाली होती.

यानंतर पवनदीपची उत्तराखंडच्या युवा ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड झाली होती. २०१७ मध्ये पवनदीप राजनने रोमियो एन बुलेट चित्रपटातील ‘तेरे लिया’ हे गाणे गायले होते. आता इंडियन आयडल १२चा ‘किताब जिंकल्यामुळे पवनदीप आपल्या जीवनातील यशाच्या शिखरावर आहे.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *