Breaking News
Loading...
Home / बातम्या / मराठमोळा युवराज घोरपडे आहे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा बॉडीगार्ड; महिन्याला कमावतो तब्ब्ल ‘इतके’ कोटी

मराठमोळा युवराज घोरपडे आहे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा बॉडीगार्ड; महिन्याला कमावतो तब्ब्ल ‘इतके’ कोटी

भारतात बॉलिवूडचं नाव घेतल्यानंतर सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या तीन खान यांना कदापि विसरून चालत नाही. सलमान (दबंग) खान, शाहरुख (किंग) खान आणि आमिर (मिस्टर परफेक्शनिस्ट) हे लगेचच डोळ्यासमोर येतात. तिघांनाही कमालीचे चाहते आहेत.

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान हा त्याच्या कित्येक गोष्टींसाठी ओळखला जातो. तो जेव्हा कधीही बाहेर जातो तेव्हा त्याचे चाहते त्याला बघण्यासाठी चांगलीच गर्दी करत असतात. आमिरची सुरक्षा व्यवस्था सांभाळणं म्हणजे काही खायचं काम नाही. खासगी कार्यक्रम असो, वा सार्वजनिक सोहळा किंवा मग अगदी शूटिंगचं लोकेशन असो – आमिर खानला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी कायमच दिसत असते.

Loading...

खरं तर बॉलिवूडमधील सर्वच सुपरस्टार्सचे सुरक्षारक्षक प्रचंड मेहनत घेतात.त्यामुळे अर्थातच त्यांचा पगारही तेवढाच रग्गड असतो.सलमान खानचा वैयक्तिक अंगरक्षक शेरा जो कायम सलमान सोबत असतो तो कोटींमध्ये पगार घेतो हे माहिती आहे. आमिर खानच्या बाबतीतही काहीसे असेच आहे. आमिर खानचा मराठमोळा बॉडीगार्ड युवराज घोरपडे हा कोटींमध्ये पगार घेतो.

‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या माहितीनुसार, युवराज घोरपडेचा वार्षिक पगार तब्बल २ कोटी रुपये इतका आहे. युवराजने वयाच्या १६व्या वर्षीच शाळेला रामराम ठोकला होता. घरच्यापरिस्थितीमुळे तो पुढे छोटी-मोठी कामं करून पोट भरत होता.पुढे त्याने घरच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्यासाठी सुरक्षारक्षकाची नोकरी करण्यास सुरुवात केली.

आमिर खानने नुकतंच लाल सिंग चड्डा या चित्रपटाचं शूटिंग संपवलं आहे. यावेळी देखील युवराज कित्येकठिकाणी आमिर खानसोबत दिसला आहे. आमिरच्या नवीन चित्रपटामध्ये करीना कपूर देखील अभिनेत्री म्हणून काम करत आहे.

Loading...

त्यानंतर त्याने आयुष्यात कधीही मागे वळून पहिले नाही. युवराज ज्या सुरक्षा एजन्सीमध्ये कामाला होता त्यामध्ये त्याने अनेक वर्ष काम आहे. त्यानंतर काही वर्षांमध्ये थेट मिस्टर परफेक्शनिस्टचा अंगरक्षक होण्याची त्याला संधी मिळाली आणि त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले. आज आमिर खान जेव्हा कधीही बाहेर पडतो तेव्हा त्याच्यासोबत त्याच्या सुरक्षेसाठी मराठमोळा युवराज ढाल बनून उभा असतो.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *