
कोणताही बाप आपल्या मुलीचं लग्न लावून देताना मुलगा चांगला आहे ना याचा कसून तपास करतो. मुलीला पुढे आयुष्यात सुख मिळावं, तिने सुखात संसार करावा हे त्यांचं स्वप्न असतं. पण अनेकदा मुलगा दारुडा निघतो. ज्यामुळे मुलीच्या संसाराची राखरांगोळी होते. अशा दारू पिणाऱ्या मुलांशी आपल्या मुलीचा विवाह करू नका असा सल्ला दिला आहे एका केंद्रीय मंत्र्याने. ते हि या मंत्र्याने आपल्या मुलाचे उदाहरण देऊन कसा मुलीला त्रास झेलावा लागतो याबद्दल भाष्य केलं आहे. जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण..
माझ्या मुलाचा दारूच्या व्यसनापायी मृत्यू झाला. त्याला आम्ही वाचवू शकलो नाही. आमच्या कुटुंबातील हा अनुभव लोकांनी लक्षात घ्यावा. दारूचे व्यसन असलेल्या मुलाशी माता पित्यानी आपल्या मुलीचा विवाह चुकूनही करू नये. हे शब्द आहेत केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री कौशल किशोर यांचे. त्यांच्या मुलाचे उदाहरण देत त्यांनी समाजाला सल्ला दिला आहे.
दारूचे व्यसन असलेल्या सरकारी अधिकाऱ्यापेक्षा निर्व्यसनी असलेला एखादा रिक्षाचालक किंवा मजूर चांगला-
एका कार्यक्रमात बोलताना मंत्री कौशल किशोर यांनी म्हंटले कि दारूचे व्यसन असलेल्या सरकारी अधिकाऱ्यापेक्षा निर्व्यसनी असलेला एखादा रिक्षाचालक किंवा मजूर चांगला जीवनसाथी ठरू शकतो. मद्यपी माणूस खूप कमी काळ जगतो. ते म्हणाले माझ्या मुलाला मित्रांमुळे दारूचे व्यसन लागले. मी खासदार व माझी पत्नी आमदार असूनही आम्ही त्याचा जीव वाचवू शकलो नाहीत.
विचार करा मंत्र्यांची हि अवस्था आहे तर सामान्य लोकांचे काय हाल असतील. देशात व्यसनामुळे २० लाख लोकांचा मृत्यू होतो. याच व्यसनामुळे चांगले शिकलेले, हुषार उत्तम नोकरी असणारे, चांगल्या घराण्यातले मुलं केवळ दारूच्या व्यसनापायी आपले स्वत:चे व विशेषत: आपल्या बायकामुलांच्या आयुष्याची नासाडी करतात.
२ वर्षाच्या मुलाने काय करायचे?
मंत्री कौशल किशोर यांचा मुलगा अकाली गेला. आपल्या मुलाबद्दल बोलताना ते भावुक झाले. ते म्हणाले कि माझा मुलगा आकाशचे दारूचे व्यसन सुटेल या आशेने त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. त्याचे लग्न लावून दिले. पण लग्नानंतर तो पुन्हा दारू प्यायला लागला. २ वर्षांपूर्वी आकाशचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याचा मुलगा फक्त २ वर्षाचा होता असेहि ती म्हणाले.
केंद्रीय मंत्री कौशल किशोर हे लखनौच्या मोहनलालगंजचे खासदार आहेत. आकाश किशोरला किडनीच्या आजाराने ग्रासले होते. आकाशची आई जया देवी हि मलिहाबादची आमदार आहे. २८ वर्षीय आकाशची किडनी फेल झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. आकाशचे २०१६ मध्ये श्वेता यांच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना ४ वर्षाचा कृष्णा हा मुलगा आहे.
याशिवाय कधीतरी एन्जॉय म्हणून दारू पिणे आणि दारूचे व्यसन असणं यात जमीन असमानचा फरक आहे हे देखील लक्षात घ्यायला हवे. कारण बऱ्याच प्रकरणात तुम्ही लग्नाच्या वेळी तो मुलगा पीत नसतो पण भविष्यात तो खुप मोठा व्यसनी झाला असे कित्येक उदाहरणं आहेत.