Breaking News
Home / नवीन खासरे / भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी लग्न का केले नाही?

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी लग्न का केले नाही?

भारतीय पोलाद उद्योगाचे जनक असणाऱ्या जमशेदजी टाटा यांचे पुत्र रतन टाटा हे आजमितीच्या भारतातील सर्वात मोठ्या उद्योजकांपैकी एक आहेत. त्यांचा स्वभाव अतिशय शांत आणि लाजाळू आहे. विशेष बाब म्हणजे दुनियेच्या खोट्या झगमगाटावर त्यांचा विश्वास नाही.

एनडीटीव्हीच्या बातमीनुसार रतन टाटा दहा वर्षांचे असताना त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. १९६२ पासून रत्न टाटांनी टाटा समूहाच्या माध्यमातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली, तेव्हापासून ते देशाचे एक प्रामाणिक व्यावसायिक म्हणून ओळखले जातात.

रतन टाटांनी लग्न का केले नाही ?

एनडीटीव्हीच्या बातमीनुसार आई वडिलांच्या घटस्फोटानंतर रतन टाटा आपल्या आजीकडे राहत होते. रतन टाटांचे शिक्षण संपल्यानंतर ते लॉस एंजेलिसला गेले आणि तिथे काम करू लागले. तिथेच ते एका मुलीच्या प्रेमात पडले. रत्न टाटा त्या मुलीला भारतात आणायचा आणि कुटुंबातील सदस्यांशी तिची ओळख देण्याचा विचार करत होते.

ते तिच्याशी लग्नही करणार होते, पण आजीची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना भारतात परत यावं लागलं. त्या मुलीचे आई-वडील मुलीला भारतात पाठवण्याच्या मनस्थिती नव्हते, त्यामुळे पुढे दोघांचे नाते तुटले आणि रत्न टाटांनी नंतर आयुष्यभर लग्न केले नाही.

रतन टाटांना व्हायचे होते आर्किटेक्ट, परंतु…

एका मुलाखती दरम्यान रतन टाटा यांनी सांगितले होते की त्यांना आर्किटेक्ट व्हायचे होते, परंतु त्यांनी इंजिनिअर बनावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. तरीदेखील आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन रतन टाटांनी अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात जाऊन शिक्षण घेतले आणि त्याचे सर्व श्रेय त्यांच्या आजीला जाते. एवढेच नव्हे तर रतन टाटा यांनी सांगितले की, त्यांना व्हायोलिन शिकायची इच्छा होती, परंतु त्यांचे वडील त्यांना पियानो शिकण्यास सांगायचे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *