Breaking News
Loading...
Home / बातम्या / भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्यावरच झाले आता गंभीर आरोप, त्या २ बिल्डरकडून कोट्यवधी घेतले..

भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्यावरच झाले आता गंभीर आरोप, त्या २ बिल्डरकडून कोट्यवधी घेतले..

सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विराधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या हे सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर रोज नवीन नवीन खळबळजनक आरोप करत आहेत. शिवसेना आणि सोमैया यांच्यात खूप आरोप प्रत्यारोप मागील काही दिवसात झाले. पण नुकतेच किरीट सोमैय्या यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरही आरोप केले होते. त्यांनतर आता अर्थ व स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण कलमे यांनी किरीट सोमय्या यांच्यावरच काही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

किरीट सोमय्या हे बिल्डरसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे. मुकेश दोषी यांच्या क्रिस्टल प्राईड आणि आनंद पंडीत यांच्या लोटस डेव्हलपर्स या बिल्डरांसाठी ते काम करत आहेत. या सर्व बिल्डरांकडून किरीट सोमय्या यांना निधी देण्यात येत असल्याचा आरोप प्रविण कलमे यांनी केला आहे.

Loading...

किरीट सोमय्या हे सातत्याने सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर आरोप करताना दिसत असतात. अशातच किरीट सोमय्या यांच्यावरच प्रविण कलमे यांनी केलेल्या या गंभीर आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप करताना किरीट सोमय्या म्हणाले होते की, म्हाडा संस्थांमध्ये काम करणाऱ्या बिल्डरांकडून 1 हजार कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश जितेंद्र आव्हाड यांनी प्रविण कलमे यांना दिले आहेत. ते सरकारी संस्थांमधील सचिन वाझे आहेत.

सोमय्या यांच्या आरोपानंतर प्रविण कलमे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांना उत्तर दिले आहे. आपल्या जवळच्या बिल्डर मित्रांचे नुकसान टाळण्यासाठी ते शांत आहेत. अनेक इमारती नियमबाह्य पद्धतीने उभारल्या आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रविण कलमे यांनी केली आहे.

Loading...

दरम्यान, प्रविण कलमे यांनी केेलेल्या गंभीर आरोपानंतर आता किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आता प्रविण कलमे यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर किरीट सोमय्या काय उत्तर देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *