Breaking News
Loading...
Home / बातम्या / भाजपने फेसबुक मार्केटिंगवर केले कोट्यवधी खर्च; मनसेचा खर्च बघून सर्वानी केले कौतुक

भाजपने फेसबुक मार्केटिंगवर केले कोट्यवधी खर्च; मनसेचा खर्च बघून सर्वानी केले कौतुक

हल्लीचे युग सोशल माध्यमांचे आहे. या जगात जर आपल्याला टिकायचे असेल तर आपल्याला सोशल माध्यमांचा आधार घेऊन मार्केटिंग करावी लागणार आहे. सध्याच्या घडीला अनेक राजकीय पक्ष पण निवडणुकांच्या काळात फेसबुक द्वारे लाईक्स, कमेंट आणि शेअर मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग करताना दिसून येत असतात.

फेसबुकच्या एका रिपोर्टनुसार ऑनलाईन मार्केटिंग करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सर्वात जास्त खर्च केलेला आहे. त्यांनी जवळपास ऑनलाईन मार्केटिंग साठी ४ कोटी ३४ लाख रुपयांचा खर्च केलेला आहे. त्यानंतर काँग्रेस पक्षाने ऑनलाईन मार्केटिंग साठी खर्च केल्याचे दिसून आले आहे.

Loading...

काँग्रेस पक्षाने ऑनलाईन मार्केटिंग साठी जवळपास १ कोटी ८२ लाख रुपये खर्च केला आहे. प्रादेशिक पक्षांनी पण मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याचे दिसून आले आहे. शिवसेना पक्षाने जवळपास ४ लाख ६३ हजार रुपये खर्च केले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यात मोठा खर्च केल्याचे दिसून आले आहे.

त्यांनी जवळपास ४ लाख ५२ हजार रुपये खर्च केले आहेत. याबाबत उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने जाहिरात करण्याच्या बाबतीत एक रुपया पण खर्च केलेला नाही. त्या पक्षाने लाईक्स, कमेंट आणि शेअरच्या बाबतीत एक रुपया पण खर्च केलेला नाही. सोशल मीडियावर राज ठाकरे यांचा पक्ष याबाबतीत खूपच मागे असल्याचे दिसून आले आहे.

त्यांनी एक रुपयाही खर्च न करता त्यांना सोशल मीडियावर लोकांचा मोठा प्रतिसाद असल्याचे दिसून आले आहे. फेसबुकचा हा रिपोर्ट राज ठाकरे जे करतो ते प्रामाणिक करतो ह्या वाक्याची शंभर टक्के प्रचिती देणारा आहे. राज ठाकरे त्यांच्या कामाचा रिपोर्ट घेऊन समाजापुढे जात असतात त्यामुळे का होईना त्यांना जनता काही प्रमाणात साथ देताना दिसून येते.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *