बातम्याराजकिय

भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांचा उमेदवारी अर्ज होऊ शकतो बाद, हे आहे कारण..

राज्यात विधानसभा निवडणूका आता अवघ्या २ आठवड्यांवर येऊन ठेपल्या आहेत. विधानसभेसाठी काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. राज्यात अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. अर्ज वापस घेण्यास वेळ मिळणार असल्याने हे काही बंडखोर आपले फॉर्म वापस घेऊ शकतात. आज अर्जाची छाननी करण्यात येत आहे.

या छाननी मध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपाचे शिर्डी विधानसभेचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा दाखल करण्यात आलेला उमेदवारी अर्ज धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जर असे झाल्यास भाजपला मोठा धक्का बसू शकतो.

शिर्डी विधानसभेच्या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी (४ ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राधाकृष्ण विखे यांच्यासमोर काँग्रेसच्या सुरेश थोरात यांचे आव्हान आहे. सुरेश थोरात यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला आहे.

राधाकृष्ण विखेंनी ज्या वकिलाकडून प्रतिज्ञापत्र तयार केले. त्या वकिलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. सुरेश थोरात यांनी संबंधित प्रकाराबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीवर आज (५ऑक्टोबर) दुपारी 3 वाजता सुनावणी होणार होती. पण अजून याचा निकाल समोर आलेला नाहीये.

स्वतःसह अन्य प्रतिनिधींचे ३ असे एकुण ४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, हे अर्ज दाखल करताना नोटरी करून दिलेल्या प्रमाणपत्रावरच काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. ज्या वकिलांकडे हे प्रमाणपत्र बनवण्यात आलं, त्यांचा नोटरी करण्याचा परवाना २०१६ मध्येच संपला असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.

विखे यांच्या उमेदवारी अर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. आता निवडणूक निर्णय अधिकारी या आक्षेपावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अर्जावर देखील काँग्रेसचा आक्षेप-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जावरून नागपुरात गोंधळाचे वातावरण आहे. मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जावर सुनावणी संपली असून लवकरच निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय जाहीर करतील. विरोधी पक्षाचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तिथे जमले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रावर शिक्का मारणाऱ्या नोटरीची टर्म संपल्याचं लक्षात आल्यानंतर काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथपत्रासाठी जे मुद्रांक विकत घेतलं होतं ते ३ तारखेला विकत घेण्यात आले होते. शपथपत्राची दस्तनोंदणी करणाऱ्या नोटरीचा शिक्का ही या शपथपत्रावर आहे. मात्र या शिक्क्यामध्ये असलेली नोटरी यांचा कार्यकाल संपण्याची तारिख २०१८ ची आहे. यावरही काय निकाल येतो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button