प्रेरणादायी

भाऊनं तब्बल ४ हजार पाणीपुरी फुकटात दिल्या, कारण ऐकून सर्वच करताहेत कौतुक

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे एका पाणीपुरी विक्रेत्याने सुमारे ४ हजार पाणीपुरीचे मोफत वाटप केले. यामागचे कारण ऐकल्यानंतर तुम्हीही पाणीपुरीवालाचे कौतुक कराल. संजीत चंद्रवंशी याच्या घरी सोनपावलांनी चिमुकलीचं आगमन झालं. कन्यारत्न मिळाल्यानंतर संजितने आपला आनंद अनोख्या पद्धतीने साजरा केला आणि लोकांना मोफत पाणीपुरी खाऊ घातली.

संजीतने आपल्या स्टॉलवर ‘फ्री पाणीपुरी’चे पोस्टर लावून पाणीपुरीची विक्री सुरू केली. काही वेळातच स्टॉलवर गर्दी झाली आणि शेकडो लोकांनी पाणीपुरीचा आस्वाद घेतला. त्यांनी संजीतचे अभिनंदनही केले. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी पाणीपुरीचा आस्वाद घेत संजीतचे कौतुक केले.

छिंदवाडा येथील रहिवासी संजित चंद्रवंशी दररोज पोला मैदानाजवळ पाणीपुरीचा स्टॉल लावतात. ते दररोज सुमारे 2000 पाणीपुरी विकतात. पण मुलगी झाल्याच्या आनंदात संजीतने त्यादिवशी 4000 पाणीपुरी विकल्या आणि त्याही फुकट. चंद्रवंशी यांना तीन भाऊ.

मात्र गेल्या 10 वर्षात त्यांच्या कुटुंबातील कोणालाही कन्यारत्न मिळाले नव्हते. आता संजीतची पत्नी गरोदर होती आणि तिला कन्यारत्न मिळाल्याचे कळल्यावर त्यांना खूप आनंद झाला. मुलगी मिळाल्याच्या आनंदात त्यांनी मोफत पाणीपुरीचे वाटप सुरू केले. लवकरच लोकांनी 4000 पाणीपुर्याही संपवल्या.

“आजच्या जगात मुलींना ओझं समजलं जातं.पण पाणीपुरीवाल्या भाऊंनी मुलगी झाली म्हणून चक्क पाणीपुरी फुकटात वाटल्या. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे समाजात लोकांच्या मनात मुलीबद्दलचा आदर वाढेल. तसंच पाणीपुरी खाणारा आज प्रत्येक व्यक्ती संजीत यांना भरभरुन आशीर्वाद देत असेल”, असं पाणीपुरीचा आस्वाद घेणाऱ्या आरती साहू नावाच्या विद्यार्थीनीनं म्हटलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button