जगात अशी काही लोक आहेत जु छोट्या छोट्या गोष्टींमधून सध्याच्या घडीला मोठा नफा कमवत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील प्रमोद सुसरे यांची गोष्ट पण जागावेगळीच आहे. कचऱ्यापासून टिकाऊ फर्निचर बनवून ते आज कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण इथपर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. कचऱ्यापासून त्यांनी अनेक उत्तम उत्तम फर्निचर बनवली आहेत.
प्रमोद सुसरे यांचा टाकाऊ पासून टिकाऊ फर्निचर बनवण्याचे स्टार्टअप आहे. त्यांचे वय २८ वर्ष असून त्यांनी तीन वर्षांमध्ये जवळपास एक कोटीपेक्षा जास्त पैसे कमावले आहेत. त्यांनी उद्यान, कॅफे आणि हॉटेलचे फर्निचर भंगारापासून बनवले आहे. त्यांनी २०१८ वर्षामध्ये भंगारापासून फर्निचर बनवण्याला सुरुवात केली. त्यांनी सध्याच्या घडीला १५ लोकांना रोजगार दिला आहे.
कोरोना काळात पण त्यांचा उद्योग चांगल्या परिस्थितीत होता. कोरोना काळात, जेव्हा ऑर्डर मिळत नव्हते, तेव्हा त्याने सॅनिटायझर डिस्पेंसर मशीन, कोविड हॉस्पिटलसाठी बेड इत्यादी बनवण्याचे काम केले. प्रमोद यांनी अतिशय हलाखीत दिवस काढले आहेत. प्रमोद यांना आलेले अनुभव त्यांचे पुढील जीवन सुकर करत गेले असे त्यांनी सांगितले आहे.
प्रमोद जेव्हा कंपनीत काम करत होता तेव्हा त्याला टाकाऊपासून टाकाऊ फर्निचर बनवण्याबद्दल कळले. मग त्यानंतर त्यांनी काही जुने टायर आणि ड्रम विकत घेतले. त्यानंतर त्याने त्यापासून फर्निचर बनवले आणि ते कॅफेमध्ये ठेवले. प्रमोदने त्याचा नंबर कॅफेवाल्याकडे ठेवला आणि ज्याला गरज असेल त्याला कॉल करायला नंबर द्या असे सांगितले.
त्याची कंपनी सध्याच्या घडीला P2S INTERNATIONAL नावाने ओळखली जात आहे. त्याला या वर्षी मार्चमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑर्डर मिळायला सुरुवात झाली. आतापर्यंत त्याने जवळपास १५ हॉटेल्स आणि कॅफेसाठी काम पहिले आहे. सध्या त्याच्याकडे भारताच्या वेग वेगळ्या राज्यातून कामाच्या ऑर्डर येत आहेत.
शेवटी त्याने म्हटले आहे की, ‘जेव्हा मी जुने टायर आणि तुटलेल्या गोष्टी खरेदी करायला लागलो, तेव्हा माझे मित्र म्हणायचे, ‘नोकरी सोडून तू का रद्दीची कामे करतोय. ‘पण माझा स्वतःवर विश्वास होता, म्हणून मी त्यांच्या बोलण्याकडे कधीच लक्ष दिले नाही. दिले नाही. आज तेच मित्र माझी स्तुती करतात, ज्यामुळे मला खूप आनंद होतो.