Breaking News
Loading...
Home / नवीन खासरे / भंगारवाल्याने खरेदी केले होते हवाईदलाचे ६ हेलिकॉप्टर; ज्यामुळे बदललं त्याचं नशीब..

भंगारवाल्याने खरेदी केले होते हवाईदलाचे ६ हेलिकॉप्टर; ज्यामुळे बदललं त्याचं नशीब..

आपण अनेकदा घरातील वर्तमानपत्रांची रद्दी भंगारवाल्याला विकत असतो. फक्त वर्तमानपत्रेच नाही तर स्क्रॅप, लोखंड आणि इतरही काही वापरात अथवा उपयोगात नसणाऱ्या वस्तू आपण भंगारात देत असतो. आपण भंगारवाल्याला स्क्रॅप वगैरे घेताना पहिले असेल मात्र एका भंगारवाल्याने चक्क हेलिकॉप्टरांची खरेदी केली आहे.

नुकतेच पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील भंगार व्यापारी मिट्टू अरोरा आणि त्यांचा मुलगा डिंपल अरोरा यांनी भारतीय हवाई दलाकडून हेलिकॉप्टर खरेदी केली आहेत. मिठू १९८८ पासून भंगाराचे काम करत आहे आणि २०१० सालापासून त्यांचा मुलगा डिंपल देखील त्यांना या कामात मदत करत आहे. मिट्टू यांचा रद्दी व्यवसाय किती मोठा आहे याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की त्याने सुमारे १० एकर जमिनीवर रद्दी गोळा केली आहे.

Loading...

सोशल मीडियाद्वारे हेलिकॉप्टर विकत घेतली गेल्याची बातमी वेगाने पसरली आणि दुसऱ्याच दिवशी प्रसारमाध्यमांनी अरोरा कुटुंबाच्या मुलाखती सुरु केल्या. सदरील विकत घेतली गेलेली भारतीय हवाई दलाची हेलिकॉप्टरे नवी दिल्लीतील हवाई दलाच्या मुख्यालयातून घेण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, हे हेलिकॉप्टर ७२ लाख रुपयांना खरेदी करण्यात आले आहेत. सदरील हेलिकॉप्टर बऱ्याच काळापासून वापरात नव्हते. त्यानंतर एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या लिलावासाठी सरकारला अहवाल पाठवला होता. डिंपल आणि त्याचे वडील मिठू यांनी नंतर हवाई दलाच्या ऑनलाईन लिलाव प्रक्रियेत भाग घेतला आणि ही स्क्रॅप्ड हेलिकॉप्टर विकत घेतली.

डिंपल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, सरकार आणि लष्कराकडून ऑनलाईन लिलावात होत असलेल्या गोष्टींवर त्यांची करडी नजर होती. त्यांना लिलावाचा कॅटलॉग अधिक मनोरंजक वाटला कारण आता स्क्रॅप केलेल्या हेलिकॉप्टर्सचा ऑनलाइन लिलाव केला जात होता. खरेदी केलेली सर्व हेलिकॉप्टरे Mi १७ हेलिकॉप्टरचे चे जुने मॉडेल आहेत.

Loading...

सध्या ही हेलिकॉप्टरे परिसरातील प्रत्येकाच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत. या हेलिकॉप्टरबद्दल लोकांमध्ये रस आहे की, लोक सतत त्यांच्या जवळ उभे राहून सेल्फी घेत आहेत असे डिंपल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *