बाळासाहेब ठाकरेंसोबत दिसणाऱ्या चिमुरड्याला ओळखलंत का? ना राज, ना उद्धव, ना आदित्य ठाकरे..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आजही लोक खूप आदर करतात. बाळासाहेबांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय न डगमगता घेतले. मुंबईसह राज्यभर शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. पण सध्या याच शिवसेनेत उभी फूट पडल्याचे चित्र आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वरच्या फळीतील नेते व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा दोन गटात शिवसेना विभागली गेली आहे. दोघेही पक्षावर दावा सांगत असून यावर निवडणूक आयोग निर्णय देणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याच दरम्यान बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एका चिमुकल्याचा फोटो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. हा चिमुकला उद्धव किंवा राज ठाकरे नाही. या मुलांचा थेट संबंध शिंदे गटाशी आहे. चला जाणून घेऊया कोण आहे हा चिमुकला…
ना राज ना उद्धव, मग हा चिमुकला नक्की कोण?
आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. त्यानिमित्ताने एका इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील एका खास व्यक्तीचा हा फोटो आहे. हा फोटो बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांचा आहे. निहार हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आहे. त्यांचे वडील बिंदुमाधव यांचे १९९६ मध्ये अपघाती निधन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे बंधू जयदेव हे निहार यांचे सख्खे काका तर राज ठाकरे हे चुलतकाका आहेत. निहार ठाकरे यांनी एलएलएमपर्यंत शिक्षण घेतले आहे. अजूनही कायद्याचा सराव करतोय.
फोटो कोणी पोस्ट केला?
निहार ठाकरे यांचा हा बालपणीचा फोटो बाळासाहेब ठाकरेंसोबतचा आहे. हा फोटो त्यांची पत्नी अंकिता हर्षवर्धन पाटील हिने पोस्ट केला आहे. अंकिता ही माजी मंत्री आणि विद्यमान भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी दोघांचा फोटो पोस्ट केला आहे.
निहारचा थेट शिंदे गटाशी संबंध!
निहार ठाकरे हे वकील आहेत, त्यांची फर्मही आहे. कायदेशीर लढाईत एकनाथ शिंदे यांना जी काही मदत लागेल, मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन, असेही निहार ठाकरे यांनी म्हटले आहे. निहार ठाकरे म्हणाले होते, ‘मी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या असून खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेणार आहे. यासोबतच शिंदे गटाच्या वतीने निहार ठाकरे सुप्रीम कोर्टात हजेरी लावताना दिसले आहेत. ‘जे खरे तेच जिंकणार’ असा विश्वास व्यक्त करत त्यांनी नेहमीच शिंदे गटाची बाजू घेतली आहे.