Breaking News
Loading...
Home / प्रेरणादायी / बापासोबत चपला, बुटं विकणारा शुभम असा झाला IAS अधिकारी !

बापासोबत चपला, बुटं विकणारा शुभम असा झाला IAS अधिकारी !

एका आयएएस अधिकारी झालेल्या मुलाच्या वडिलांनी मुलाच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल मुलाखतीमध्ये सांगितले. आणि ही मुलाखत काही काळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली. जेव्हा अधिकारी मुलाचे वडील बोलत होते तेव्हा त्यांचा घसा दाटून आला होता आणि आनंदाश्रू वाहत ते मुलाबद्दल सगळ्यांना सांगत होते.

अनिल गुप्ता ज्यांचे चप्पलचे आणि बूट विक्रीचे दुकान होते, त्यांच्या मुलाने देशातील सर्वात अशी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत आयएएस अधिकारी पदावर मजल मारली होती. आयएएस अधिकारी असलेल्या शुभम गुप्ता यांचा राजस्थानच्या सीकर जिल्ह्याच्या नीमकाठाणा उपविभाग मुख्यालयापासून ५ किमी अंतरावर असलेल्या भुडोली गावी जन्म झाला.

Loading...

गुप्ता कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. आजही ते जयपूरच्या रांगोळी गार्ड वैशाली येथे भाड्याच्या घरात राहत आहेत. सातवीत असताना उत्पन्नाअभावी शुभम आपल्या कुटुंबासह महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू रोड येथे राहायला गेला होता. तेथे वडील अनिल यांनी बूट आणि चप्पल विकण्याचे दुकान उघडले.

शुभम महाराष्ट्रातील डहाणू रोडपासून ७० किमी अंतरावर गुजरातच्या वापी येथे असलेल्या श्री स्वामी नारायण गुरुकुलमध्ये शिकत असे. शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी चार ते नऊ पर्यंत शुभम दुकान सांभाळायचा. शूज आणि चप्पल विकणारा आपला मुलगा शुभम कधीतरी आयएएस अधिकारी बनेल असा विचार अनिल यांनी स्वप्नातही केला नव्हता.

१०वी झाल्यानंतर शुभूम दिल्ली येथे १२वी च्या आणि पदवीच्या शिक्षणासाठी गेला. शुभमने २०१२-२०१५ मध्ये दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात बीए आणि नंतर एमए केले. वडील मुलाच्या शिक्षणाच्या खर्चासाठी दरमहा आठ हजार रुपये पाठवत असत. मात्र आठ हजार ही रक्कम कमी असल्याने शुभम अत्यंत काटकसरीने हे पैसे वापरत असे.

Loading...

शुभमने जेव्हा पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली तेव्हा तो यशस्वी झाला नाही. दुसऱ्या प्रयत्नात त्याने ३६६वा रँक मिळवला. शिमलामध्ये प्रशिक्षण घेत असताना, शुभम यूपीएससी २०१७ मध्ये पुन्हा तिसऱ्यांदा आपले नशीब आजमावू लागला आणि यावेळीही तो अपयशी ठरला.

वर्ष 2018 मध्ये शुभमला यूपीएससी परीक्षेत सहावा रँक मिळाला. भारतीय ऑडिट आणि अकाऊंट सेवेत नोकरी मिळाल्यानंतरही शुभमने मेहनत करणे सोडले नाही. जयपूर येथे भारतीय लेखापरिक्षण आणि लेखासेवेचे अधिकारी म्हणून त्यांना सहाय्यक महालेखापाल यांची नियुक्ती मिळाली. डिसेंबर २०१८ ते ऑगस्ट २०२० पर्यंत काम केले, पण त्यानंतर यूपीएससी २०१८ चा निकाल आला, ज्यामध्ये शुभम गुप्ताला सहावा क्रमांक मिळाला. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, शुभमची पहिली पोस्टिंग म्हणून एटापल्ली, नागपूर येथे एडीएम म्हणून तैनात करण्यात आली आहे.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *