बदलीच्या बाबतीत तुकाराम मुंडे यांचाही रेकॉर्ड मोडला; हि महिला IAS अधिकारी आहे तरी कोण..

राज्यात अधिका-यांच्या बदल्या होतच असतात पण बदल्यांसाठी ओळखले जाणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे. तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात त्यांची बदली हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांची एखाद्या ठिकाणी थोडा जम बसला कि बदली होते हे आता निश्चितच झालं आहे. आतापर्यंत 16 वर्षात 20 वेळा बदली झालेले एकमेव अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. नुकतीच त्यांची बदली झाल्याने ते खूप चर्चेत आले होते. राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने नुकत्याच सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
दरम्यान मुंडेंचं ठीक आहे पण त्यांचं रेकॉर्ड तोडण्यात IAS महिला अधिकारी मागे नाहीये. राजेश पाटील यांची सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी तर भाग्यश्री बानायत यांना नाशिक महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आले आहे. आजच्या बदलीमुळे नाशिक महापालिकेला स्वच्छ, कार्यक्षम अधिकाऱ्यांचा लाभ मिळाला आहे.
सरकारने एका महिन्यात तिसऱ्यांदा आयएएस बानायत यांची बदली केली आहे. त्यामुळे आता तुकाराम मुंढेंचा विक्रम मोडीत निघाला आहे. भाग्यश्री बानायत यांची महिनाभरात तिसऱ्यांदा बदली झाली आहे. त्यामुळेच अल्पावधीत सर्वाधिक बदल्या करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर झाला आहे. गेल्या महिन्यात साईबाबा संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांची विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, नागपूरमध्ये सदस्य सचिव म्हणून बदली केली होती.
भाग्यश्री बानायत यांनी शिर्डी साई मंदिर संस्थांनच्या सीईओ पदी 2021 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या काजकाजावर स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे बानायत यांची शिर्डी संस्थानातून बदली करण्यात येऊन त्यांना विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्त केले होते.
त्यानंतर आठवडाभरातच त्यांची नाशिक विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती झाली. आता महिनाभरात त्यांची पुन्हा नाशिक महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यामुळे त्यांनी बदल्यांच्या बाबतीत तुकाराम मुंडेंना देखील मागे टाकले आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल..
कोण आहेत भाग्यश्री बानायत..?
भाग्यश्री बानायत शालेय शिक्षण अमरावती जिल्ह्यातील हिवरखेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. तर मोर्शी येथील महाविद्यालयातुन त्या बीएस्सी झाल्या. बीएस्सीनंतर त्यांनी बीएड केले. आई तुळसाबाई,वडील भीमराव हे दोघेही शिक्षक असल्याने घरी शैक्षणिक वातावरण होतं. त्यामुळे बीएस्सी नंतर त्या बीएड झाल्या. पुढे एक वर्ष एमएससी केलं. त्याच दरम्यान वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. खरं म्हणजे अशा दुर्दैवी परिस्थितीत जवळच्या नातेवाईकांनी साथ द्यायला हवी होती. पण तसं न करता प्रॉपर्टी वरून वडिलांच्या मृत्यूनंतर विसाव्या दिवशी भाग्यश्री याना आईसह कोर्टात हजर रहावं लागलं. त्यातून पुढील संघर्षाची त्यांना जाणीव झाली. आथिर्क दृष्टीने सक्षम व्हायचं त्यांनी ठरवलं.
अमरावती महानगरपालिकेत त्यांना विषयतज्ञ म्हणून काम मिळालं. आईचं आजार पण, तिची सेवा शुश्रुषा, घरकाम सांभाळून त्या गावाहून अमरावती ला जा – ये करत. त्याच्या जोडीला मुळे त्या स्पर्धा परीक्षा द्यायला लागल्या. अमरावती येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या संस्था किंवा खाजगी कोचिंग क्लास नव्हते. त्यामुळे त्यांना सर्व भर स्व अध्ययन पद्धतीवर द्यावा लागला. वडिलांचं निधन, आईचं आजारपण, स्वतःच्या काही वैद्यकीय समस्यावर मात करत, त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ त्यांना मिळू लागलं.
२००६ साली त्यांची नायब तहसीलदार व प्रकल्प अधिकारी, शिक्षण विभाग या दोन्ही वर्ग २ च्या पदांसाठी निवडी झाल्या. भाग्यश्री याना आयएएसच व्हायचं होतं. म्हणून त्यांनी दोन्ही पदं नाकारली. दुसरीकडे सततच्या गैर हजेरीमुळे त्यांची अमरावती महानगरपालिकेची नोकरी गेली. तीन पदं हाती असताना नंतर एकही पद राहिलं नाही! परंतु त्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा त्या देत राहिल्या. २०१० साली थोडक्यात अपयश आलं. पण अपयशामुळे खचून न जाता २०११ साली अधिक जिद्दीने, चिकाटीने अभ्यास केला. त्यांची अभ्यासुवृत्ती, परिश्रम, जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा फलद्रूप झाली. २०१२ साली त्या भारतीय प्रशासकीय अधिकारी म्हणून निवडल्या गेल्या.
अमरावती महानगरपालिकेत त्यांना विषयतज्ञ म्हणून काम मिळालं. प्रथम 2005 साली प्रकल्प अधिकारी, 2006 साली तहसीलदार, 2007 साली सहाय्यक आयुक्त, विक्रीकर विभाग अशा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत त्यांच्या सलग निवडी होत गेल्या. 2012 साली त्यांची भारतीय प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.