Breaking News
Loading...
Home / बातम्या / फेसबुकवर ‘या’ नावाने रिक्वेस्ट आल्यास बसेल खिशाला झळ; दूर राहा या फ्रेंड रिक्वेस्ट पासून

फेसबुकवर ‘या’ नावाने रिक्वेस्ट आल्यास बसेल खिशाला झळ; दूर राहा या फ्रेंड रिक्वेस्ट पासून

सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येताना दिसून येत असते. फेसबुकवरून मुलींच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ब्लॅकमेल करण्याच्या पण अनेक घटना घडलेल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे पण फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे दिसून आले आहे.

त्यांच्या अकाऊंटवरून पैशाची मागणी करण्यात आल्याचे पण दिसून आले आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचे अकाउंट हॅक झाले आहे. त्यांच्या नावाने फेसबुक अकाउंट उघडून त्यावरून पैशाची मागणी करण्यात येत होती . त्यांचे अकाउंट ब्लॉक करण्यात आले असून त्यावरून कोणताही मेसेज आल्यास पोलिसांना कळवण्यात यावे असे सांगण्यात आले आहे.

Loading...

रत्नागिरी जिल्ह्याची जिल्हाधिकारी बी एन पाटील यांनी सरकारी योजनेच्या माध्यमातून आलेली माहिती त्यांच्या अकाऊंटच्या माध्यमातून देण्यात येत होती. पण त्यांच्या नावाने फेक अकाउंट उघडून अधिकारी आणि प्रतिष्ठित लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात येत होती. त्यावरून पैशांची मागणी करण्यात येत होती.

या फेसबुक अकाऊंटवरून येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यात येऊ नये असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. ज्यांना पैशाची मागणी करण्यात आली असे बरेच जण असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी बी एन पाटील यांनी नागरिकांनी अधिक सतर्क राहावे असेही सांगण्यात आले आहे.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *