बातम्या

फक्त एका चुकीमुळं 6 दिवसांत गेलं ‘या’ IAS अधिकाऱ्याचं कलेक्टर पद, असं होतं कारण

यूपीएससी परीक्षेत यश मिळवणे हे एखाद्या स्वप्नासारखे असते. ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे असे मानले जाते. ही परीक्ष क्रॅक करणे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत असतात. श्रीराम व्यंकटरमण हे एक असे आयएएस अधिकारी आहेत, ज्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची सर्वात कठीण परीक्षा देशात दुसऱ्या रँकसह क्रॅक केली होती. पण त्यांच्या नशिबात मात्र वेगळंच होतं. कलेक्टर पदावर गेलेल्या श्रीराम यांचं पद याच्या ६ दिवसात गेलं. जाणून घेऊया नेमकं काय असं घडलं..

श्रीराम व्यंकटरमण हे 2012 चे UPSC टॉपर होते. खरे तर ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 5 ते 10 वर्षेही लागतात. मात्र, यांपैकी काही आयएएस असे असतात, ज्यांना फार लवकर कलेक्‍टर पदाची पोस्टिंग मिळते. पण विचार करा की, जर कवळ 6 दिवसांतच एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाली तर त्याला किती वाईट वाटत असेल. असेच IAS श्रीराम व्यंकटरमण यांच्यासोबत घडले आहे. तो 2012 चा UPSC टॉपर होता. त्यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. मात्र अवघ्या सहा दिवसांनंतर एका घटनेमुळे त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले.

आधी एमबीबीएस करून डॉक्टर नंतर कलेक्टर बनले श्रीराम

मूळचे केरळमधील कोचीचे, IAS अधिकारी श्रीराम वेंकटरामन यांचे शालेय शिक्षण भावना विद्या मंदिर गिरीनगर येथून झाले. एमबीबीएसचा अभ्यास केल्यानंतर, त्याने यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या प्रयत्नात परीक्षेत अव्वल ठरला. तो अखिल भारतीय द्वितीय क्रमांकावर होता. IAS अधिकारी होण्यापूर्वी श्रीराम वेंकटरामन हे पेशाने डॉक्टर होते. त्यांनी 2010 मध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालय तिरुवनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी प्राप्त केली.

व्यंकटरमन यांनी एमबीबीएस केल्यानंतर, यूपीएससी (UPSC) सिव्हिल सर्व्हिसची तयारी केली होती आणि दुसऱ्याच प्रयत्नात ते यशस्वी झाले. एका IAS अधिकाऱ्याच्या रुपात व्यंकटरमन हे वादात राहिले आहेत. त्यांचे शालेय शिक्षण भावांश विद्या मंदिर-गिरिनगर येथून पूर्ण झाले आहे. यानंतर त्यांनी वर्ष 2010 मध्ये गव्हर्नमेन्ट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस झाले.

नेमकं काय घडलं-

IAS श्रीराम व्यंकटरमन यांनी 2019 मध्ये नशेत गाडी चालवली आणि एका पत्रकाराला धडकले होते, असा आरोप आहे. या घटनेत पत्रकार केएम बशीर यांचा मृत्यू झाला होता. 35 वर्षीय बशीर सिराज ब्यूरो चीफ होते. IAS श्रीराम वेंकटरामन यांच्यावर 2019 मध्ये दारू पिऊन गाडी चालवल्याचा हा आरोप आहे. घटनेच्या वेळी त्यांच्यासह महागड्या कारमध्ये त्याचा एक मॉडेल मैत्रीण होती, असे सांगण्यात येते. त्यांनी म्युझियम रोडवर उभ्या असलेल्या मोहम्मद बशीर (35) यांच्या मोटारसायकलला भरधाव कारने धडक दिली. ते कामावरून घरी परतत होते.

धडक एवढी जोरदार होती की मोटारसायकल आणि कारचे अनेक तुकडे रस्त्यावर विखुरलेले आढळले आणि घटनास्थळापासून काही मीटर अंतरावर बशीरच्या चप्पलांसह काही सामान आढळून आले. रस्त्यावर रक्ताचे डाग दिसत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 279 (सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे वाहन चालवणे) आणि 304A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आयएएस अधिकारी श्रीराम वेंकटरामन यांना पोलिसांनी अटक देखील केली होती.

यानंतर केरळ सरकारने त्यांना अलपुझा जिल्ह्याचे कलेक्टर बनवले होते. यामुळे तेथील जनतेने त्यांचा विरोध केला होता. यानंतर, सरकारला त्यांना कलेक्टर अथवा जिल्हाधिकारी पदावरून हटवावे लागले होते आणि त्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली होती.

तिरुवनंतपुरम जिल्हा न्यायालयाने IAS अधिकारी श्रीराम व्यंकटरमन यांच्यावरील हत्येचा आरोप रद्द केला आहे. केरळ सरकारनेही 2020 मध्ये व्यंकटरमन यांचे निलंबन रद्द केलो होते. यानंतर त्यांच्याकडे आरोग्य विभागातचे ज्वाइंट सेक्रेटरी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. ते सध्या केरल स्टेट सिव्हिल सप्लाईज कॉर्पोरेशन लिमिटेडचे जनरल मॅनेजर आहेत.

IAS टॉपरशी लग्न केले

आयएएस वेंकटरामन यांनी एप्रिल 2022 मध्ये अलाप्पुझा जिल्हा जिल्हाधिकारी रेणू राज यांच्याशी लग्न केले. रेणू राज 2014 च्या बॅचची टॉपर होती. आयएएस वेंकटरामन यांचे हे पहिले लग्न होते तर रेणू राज यांचे दुसरे लग्न होते. ती कोट्टायम येथील रहिवासी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button