Breaking News
Loading...
Home / प्रेरणादायी / पोलीस हवालदार ते आयपीएस पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास करणारे विजयसिंह गुर्जर

पोलीस हवालदार ते आयपीएस पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास करणारे विजयसिंह गुर्जर

आयपीएस आणि आयएएस या पदांना मिळवण्यासाठी दरवर्षी कित्येक उमेदवार कष्ट घेत असतात. मात्र ज्यांच्याकडे संयम, चिकाटी, धैर्य हे सर्व गुण आहेत, त्यांनाच या पदापर्यंत पोहोचता येत. काही उमेदवार असे देखील असतात जे यूपीएससीचा अभ्यास करत असताना दुसरीकडे नोकरी करत असतात. असे असतानाही सातत्याने कष्ट घेतल्यानंतर कित्येक उमेदवारांना यश मिळाले आहे.

आयपीएस विजयसिंह गुर्जर हे नाव संघर्ष, मेहनत आणि यशाचे उत्तम उदाहरण आहे. देवीपुरा या छोट्याशा खेडेगावातील लक्ष्मणसिंहचा मुलगा विजयसिंहाने आजूबाजूला असणाऱ्या खेडेगावांमध्ये कोणालाही न जमणारी गोष्ट करून दाखवली. सहसा, एकदा लोकांना सरकारी नोकरी मिळाली की ते त्यांचे आयुष्य त्यात घालवतात, पण विजयसिंह गुर्जर यांनी नोकरी करत असताना यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत थेट जिल्हाधिकारी होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले.

Loading...

विजय सिंह गुर्जर यांचा जन्म १९८७मध्ये देवीपुरा या छोट्या खेडेगावात झाला. ते पाच भावंडांपैकी तिसरे आहेत. विजयसिंह गुर्जर यांचे वडील शेती करत असत. ते देखील अभ्यासात सामान्य असल्याने वडिलांना शेतीमध्ये मदत करत असत. देवीपुराच्या खासगी शाळेतून ते १०वी उत्तीर्ण झाले आणि १२वीला ५४.६ टक्के त्यांनी मिळवले. त्यानंतर शासकीय संस्कृत आचार्य महाविद्यालय चिराना येथून संस्कृत विद्याशाखेत ५४.५ टक्के गुणांसह पदवी प्राप्त केली.

त्यानंतर त्यांनी पोलीसांमध्ये भरती होण्यासाठी तयारी सुरु केली. जून २०१० मध्ये ते दिल्ली पोलिसात हवालदार झाले. सरकारी नोकरी मिळाल्यानंतरही तयारी चालू राहिली आणि डिसेंबर २०१०मध्ये सहा महिन्यांतच ते दिल्ली पोलिसात उपनिरीक्षक बनण्यात यशस्वी झाले. त्यानंतरही त्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला. दोन वर्षांनी जानेवारी २०१३ मध्ये विजय गुर्जर यांची केंद्रीय उत्पादन शुल्क मध्ये निरीक्षक म्हणून निवड झाली, त्यानंतर ते तिरुअनंतपुरम, केरळ मध्ये एक वर्ष राहिले आणि फेब्रुवारी२०१४ मध्ये आयकर विभाग, दिल्ली मध्ये निरीक्षक झाले.

याकाळात त्यांनी तीनवेळेस यूपीएससी परीक्षा दिली मात्र यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. २०१६ साली मात्र त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले आणि ते नागरी सेवांच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. मात्र कोणत्याही पदापर्यंत त्यांना पोहोचता आले नाही. पाचव्या प्रयत्नात म्हणजेच २०१७ साली त्यांनी यूपीएससी परीक्षेमध्ये ५७४वा क्रमांक मिळवला.

Loading...

आयपीएस विजयसिंह गुर्जर यांचे प्रशिक्षण हैदराबादच्या पोलीस अकादमीमध्ये पूर्ण झाले आहे. आता त्यांना आयपीएस म्हणून गुजरात केडर मिळालेलं आहे. त्यांना गुजरातच्या भावनगरमध्ये पोस्टिंग देण्यात आले आहे. सध्या ते गांधीनगरमध्ये कायद्याशी संबंधित एक महिन्याच्या प्रशिक्षणावर आहेत. आजही त्यांची तयारी सुरु आहे आणि आयएएस बनण्याचे त्य्यांचे स्वप्न आहे.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *