Breaking News
Loading...
Home / बातम्या / पोलीस आयुक्त पदाचा थाटबाट सोडून रोज नाशिकच्या गंगेत स्नान करणारा दबंग आयपीएस

पोलीस आयुक्त पदाचा थाटबाट सोडून रोज नाशिकच्या गंगेत स्नान करणारा दबंग आयपीएस

खाकी वर्दीत गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणारे अनेक दबंद आयपीएस, आयएएस अधिकारी आपण अनेकदा पाहिले असतील. नाशिकचे सध्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडे हे देखील आपल्या पोलिसी दबंगगिरीसाठी ओळखले जातात. मात्र या व्यतिरिक्त देखील त्यांचं एक श्रद्धाळू आणि अनोखं रूप आज सर्वांना बघायला मिळालं आहे.

पोलीस आयुक्त असणारे दीपक पांडे यांचा गोदावरी नदीत स्नान करत असतानाच एक फोटो कमालीचा व्हायरल झाला आहे. याबाबदल अधिक माहिती अशी की दीपक पांडे आणि त्यांचे वडील नित्यनियमाने गोदावरी नदीमध्ये स्नान करतात. त्यांच्या वडिलांचे वय ९० वर्ष आहे.

Loading...

बिहार राज्यात गंगा किनारी राहणाऱ्या दीपक पांडे यांची नाशिक जिल्ह्यात बदली झाली आणि दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गोदामाईच्या दिशेने ते आकर्षित झाले. त्यांचे वडील आणि ते स्वतः गेल्या दहा महिन्यांपासून नित्यनियमाने रोज पहाटे ब्रह्म मुहूर्तावर गोदावरीच्या पात्रात स्नान करतात. काठीचा आधार घेऊन चालणारे शिवानंद पांडे म्हणजेच दीपक पांडे यांचे वडील गोदावरीच्या पात्रात असा सूर मारतात की तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वासच बसणार नाही.

याबाबत दीपक पांडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की या स्नानामागे धार्मिकता नाही तर शास्त्र आहे. नदीच्या वाहणाऱ्या पाण्यामध्ये प्रचंड ताकद असते, पंचमहाभूते असणारे स्नान इथे घडते. शरीरासाठी जल, वायू, प्रकाश आवश्यक असल्यानं जल चिकित्सा करण्यासाठी आपण इथं येतो असं पांडे यांनी म्हटलं आहे.

आयपीएस अधिकारी झाल्यानंतर नदीकाठी याआधी कधीच पोस्टिंग मिळाली नव्हती. त्यामुळे कधी नदीकाठी स्नान करण्याचा योगच आला नाही. माझे वडील गेल्या ५० वर्षांपासून गंगा स्नान करतात आणि ते माझे गुरु असल्याने मीही परंपरा सुरु ठेवणार असल्याचे दीपक पांडे यांनी म्हटले आहे.

Loading...

आयपीएस अधिकारी म्हटल्यावर सुखवस्तु आयुष्य , थाट बाट डोळ्यासमोर येतो , मात्र सर्वसामान्य नागरिकांबरोबर पोलीस अधिकारी ही गोदावरी नदीत स्नान करत असल्याने नागरिकांना त्यांच्याविषयी कुतूहल वाटते . अधिकारीच गोदापत्रात स्नान करत असल्याने गोदावरी प्रदूषणमुक्त होईल गावकरी नदीपात्रात कचरा , नाल्यांचे पाणी टाकणे बंद करतील असा विश्वास सखाराम वाकोडकर यांच्यासारख्या नागरिकांना आता वाटू लागला आहे.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *