मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात पूजा चव्हाण प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात सुरुवातीपासून अनेक दावे प्रति दावे केले गेले तर नवनवीन खुलासे देखील झाले. महाविकास आघाडीमधील शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात आल्याने हे प्रकरण चांगलंच तापलं.
या प्रकरणात १२ ऑडिओ क्लिप सुरुवातीलाच व्हायरल झाल्या होत्या. त्यांनतर मोठा गोंधळ उडाला होता. पूजा चव्हाणच्या कुटुंबियांकडून देखील विविध खुलासे करण्यात आले. दरम्यान पूजा चव्हाण प्रकरणात आजही अनेक गोष्टी अशा आहेत ज्याची माहिती समोर आलेली नाहीये.
पूजा चव्हाण प्रकरणात असे काही प्रश्न आहेत जे आजही अनुत्तरित आहेत. यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे पूजा चव्हाणचा पो स्टमा र्टम रिपोर्ट काय सांगतो हे जाहीर झालेले नाहीये. यामध्ये पूजा हि पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून डो क्यावर प डली आणि तिचा मृ त्यू झाला असे नमूद आहे. तिच्या मणक्याला आणि डोक्याला मा र लागला होता. तर पूजा म द्य पि ऊन होती अशी कुठलीही माहिती या रिपोर्ट मध्ये असल्याचे पोलिसांनी जाहीर केलेले नाहीये. किंवा ज्या चर्चा होत्या त्यांना देखील दुजोरा दिलेला नाहीये.
या प्रकरणात दुसरी खटकलेली गोष्ट म्हणजे पोलिसांची भूमिका. कारण पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांनी अद्यापपर्यंत अधिकृत पत्रकार परिषद घेतलेली नाहीये. याशिवाय पोलीस अधिकृत माहिती देण्यास देखील टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे साहजिकच पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात आणखी एक गोष्ट समोर आलेली नाहिये. जेव्हा रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या होत्या तेव्हा अरुण राठोडला कथित मंत्री हा मोबाइल आणि लॅपटॉप त्याच्या ताब्यात घ्यायला सांगत आहे. तेच मोबाईल आणि लॅपटॉप सध्या कुठे आहेत याबद्दल माहिती समोर आलेली नाहीये. पुणे पोलिसांनी देखील त्यांच्याकडे मोबाईल आणि लॅपटॉप आहे का नाही याबद्दल माहिती दिलेली नाहीये.
अरुण राठोड राहत असलेल्या घरात जो विलास चव्हाण सोबत राहत होता तो पूजाचा भाऊ होता का याबद्दल देखील माहिती समोर आलेली नाहिये. तर घरमालकाने घर का खाली करायला सांगितलं होतं असाही प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेच्या काही दिवसांपूर्वी मालकाने अरुण राठोडला घर खाली करण्यास सांगितले होते. अरुणने घर मालकाला पूजा आपली सख्खी बहीण असल्याचे देखील सांगितले होते.
या प्रकरणात एक महत्वाचा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. तो म्हणजे पूजा चव्हाण पुण्यात नेमकं काय करण्यासाठी आली होती. पूजाच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार ती इंग्लिशचे क्लास करण्यासाठी पुण्यात आली होती. पण तिच्यावर कुठले तरी उपचार केले जाणार होते याबद्दल ऑडिओ क्लीपमधून समोर आले आहे. ते उपचार काय होते हे अजून समोर आले नाहीये. तर पूजाच्या चुलत आज्जीने म्हंटले आहे कि तिला कोणी तरी पुण्यात बोलवलं होतं.
पूजा चव्हाण प्रकरणात ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यात त्यामध्ये तिच्या कृ त्याविषयी आधीच खूप चर्चा झालेली दिसून येते. म्हणजे पूजा असे पा ऊल उचलणार हे आधीच माहिती होते का? असा प्रश्न समोर येत आहे. त्या ऑडिओ क्लिपची सत्यता अजून समोर आलेली नाहीये.
दरम्यान या प्रकरणात ऑडिओ क्लिप खूप चर्चेच्या विषय राहिल्या आहेत. त्या ऑडिओ क्लिप अरुण राठोड यानेच घा बरून दिल्याचे समोर आले आहे. कारण जेव्हा एका स्थानिक नेत्याने अरुण राठोडला कसून चौकशी केली तेव्हा त्याने घा बरून मंत्र्यांचं नाव घेतलं आणि आपल्याकडे ऑडिओ क्लिप असल्याचं सांगितलं.