Breaking News
Loading...
Home / नवीन खासरे / पुण्यातील हे कुटुंब आहे देशातील सर्वात उंच कुटुंब; कुटुंबप्रमुखाची उंची तर सात फुटांपेक्षा जास्त

पुण्यातील हे कुटुंब आहे देशातील सर्वात उंच कुटुंब; कुटुंबप्रमुखाची उंची तर सात फुटांपेक्षा जास्त

आजच्या जगात जिथे काही बोलले जाते तिथेच काहीतरी विकले जाते. दिखाऊपणा दाखवून विकण्याचे प्रमाण हल्लीच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. हल्ली उंची वाढवण्याच्या नावाखाली वेग वेगळे उत्पादन ग्राहकांना जाहिरातीच्या माध्यमातून प्रलोभने दाखवले जातात. त्यामुळे ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणावर फसवणुकीच्या आहारी गेला आहे.

बालपणी मुलाची उंची वाढावी म्हणून त्याला झाडाला लटकायला सांगितले जात असे. काही जण तर उंची वाढावी म्हणून सकाळ सकाळी पोहायला जात असत. उंची न वाढण्यामागे काही प्रमाणात अनुवंशिकता पण कारणीभूत असते. भारतात एक असे कुटुंब आहे ज्याने याच उंचीचा विक्रम मोडला आहे.

Loading...

उल्लेखनीय बाब म्हणजे पुण्याच्या कुलकर्णी कुटुंबाचा यात समावेश होत आहे. महाराष्ट्रासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. कुलकर्णी कुटुंबातील प्रत्येक सदस्याची उंची ६ फुटापेक्षा जास्त आहे. भारताची सर्वसाधारण माणसांची उंची साडे पाच फूट उंचीपर्यंत आहे.

पण या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची उंची साधारण सहा फुटापेक्षा जास्त आहे. त्यांच्या घरातील सर्वांची उंची २६ फूट आहे. शरद कुलकर्णी हे कुलकर्णी कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्यांची उंची ७ फूट १.५ इंच आहे. शरद आणि संजोग हे दोघे जोडपे भारतामधील सर्वात उंच जोडपे आहे.

त्यांच्या नावावर तसा विक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आहे. कुलकर्णी घरातील मुली पण उंच आहेत. या कुलकर्णी कुटुंबाचे वैशिष्ठ्य म्हणजे हजारो लोकांच्या गर्दीत पण ते उठूनच दिसतात. कुलकर्णी कुटुंब यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा कमी वापर करतात.

Loading...

गरज असेल तिथे ते शक्यतो स्कुटीनेच प्रवास करतात. कुलकर्णी कुटुंबाच्या नावावर एक आगळा वेगळा विक्रम पण झाला आहे. जगभरातून सर्वात जास्त उंची असल्याचा मान त्यांच्या कुटुंबानेच मिळवला आहे. त्यांच्या घरातील सर्व कुटुंबाची मिळून उंची जवळपास २६ फूट आहे.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *