ब्रॅंडन मॅक्युलम ! न्यूझीलंडचा धडाकेबाज विकेटकिपर आणि बॅट्समन ! २०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडच्या संघाचा कॅप्टन म्हणून त्याने संघाला फायनलपर्यंत नेले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधुन मॅक्युलमने निवृत्ती घेतली आहे. २०१९ चा वर्ल्ड कप सुरु झाल्यानंतर अनेक क्रिकेट तज्ञांनी सेमीफायनल आणि फायनलला कोणता संघ येणार याचे कयास लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र इकडे त्यांच्या एक पाऊल पुढे टाकत मॅक्युलमने आपल्या मोकळ्या वेळात संपूर्ण वर्ल्ड कपमधील सामन्यांमध्ये कोण जिंकणार कोण हरणार याचा निकाल आधीच सांगून टाकला आहे.मॅक्युलमच्या एक्झिट पोलमध्ये काय निकाल सांगितला आहे ?मॅक्युलमने आपल्या सामनापूर्व एक्झिट पोलमध्ये सर्व संघांच्या वर्ल्ड कपमधील कामगिरीचा लेखाजोखा सांगितला आहे. मॅक्युलमच्या सांगण्यानुसार विश्वचषकाचा यजमान संघ इंग्लंड आपल्या ९ पैकी ८ सामने जिंकणार असून ऑस्ट्रेलियायाकडून त्यांचा पराभव होणार आहे. २०१५ चा विश्वचषक विजेता संघ ऑस्ट्रेलिया तीन पराभवांसह ६ सामने जिंकून सेमीफायनलपर्यंत पोहोचणार आहे. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि पाकिस्तान प्रत्येकी पाच सामन्यात विजय आणि चार सामन्यात पराभव पत्करून नेट रन रेटच्या आधारे सेमीफायनलचे दावेदार असणार आहेत. डार्क हॉर्स अफगाणिस्तान संघ श्रीलंका आणि बांगलादेशला हरवेल, मात्र सात पराभवांसह गुणतालिकेत आठव्या स्थानी राहील. श्रीलंका आणि बांगलादेशचे संघ एका विजयासह गुणतालिकेत खाली राहतील.
भारताच्या प्रदर्शनाबद्दल मॅक्युलम काय म्हणतो ?मॅक्युलमच्या भविष्यवाणीनुसार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आपल्या ९ पैकी ८ सामन्यात विजय मिळवेल. ऑस्ट्रेलियासोबतच्या सामन्यात भारताचा संघ पराभूत होईल. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या जोडीला भारतीय संघ सेमीफायनलला जाईल. सेमीफायनलमध्ये चौथा संघ पाकिस्तन, वेस्टइंडीज किंवा दक्षिण आफ्रिका यापैकीएक असेल.
मार्क वॉ सुद्धा मॅक्युलमच्या मताशी सहमत ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मार्क वॉ यानेही ब्रॅंडन मॅक्युलमच्या भविष्यवाणीचे समर्थन केले आहे, मात्र भारतीय संघ सेमीफायनलला पोहचेल यावर त्याला थोडी शंका आहे. भारतीय संघाच्या तयारीबाबत आणि मधल्या फळीतील बॅटिंग ऑर्डरबाबत अनिश्चितता असल्याचे त्याचे म्हणणे आहे. मॅक्युलमची भविष्यवाणी कितपत खरी ठरेल ते पाहण्यासारखे आहे.
भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेसोबत-या स्पर्धेत एकुण ४८ सामने होणार असुन १९९२ च्या विश्वचषकाप्रमाणेच विश्वचषक 2019 चे स्वरूप असणार आहे. म्हणजेच 10 संघात रंगणाऱ्या या विश्वचषकात प्रत्येक संघ साखळी फेरीत एकमेकांविरूद्ध लढतील आणि यातील पहिले चार संघ उपांत्य फेरीत जातील. जो संघ गुणतालिकेत अव्वल आम्ही चौथ्या स्थानावर असेल तो त्यांच्यात पहिला उपांत्य सामना होईल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या संघात दुसरा उपांत्य सामना होईल.भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ जून रोजी होणार आहे. साउथॅंप्टन मैदानावर हा सामना खेळला जाणारा आहे. तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियासोबत ९ जून रोजी आहे. भारतीय प्रेक्षकांना ज्या सामन्याची मोठ्या उत्सुकतेने वाट बघतात तो पाकिस्तानविरुद्धचा सामना १६ जून रोजी होणार आहे.