‘नीट झाल्यावर मी जाऊन आधी त्याच्या कानाखाली खेचेन’, कपिल देव ऋषभ पंतवर का संतापले..

भारताचा माजी कर्णधार कपिल देव अचानक भारतीय खेळाडूवर रागावलेले दिसले आहेत. त्यांनी अचानकपणे केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाच्या कर्णधाराला अचानक टीम इंडियाच्या एका खेळाडूवर राग आला. तो म्हणाला, मी जाऊन आधी त्याच्या कानाखाली खेचेन. कपिल देव यांच्या या वक्तव्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. नेमकं कपिल देव असं का म्हणाले आणि हा खेळाडू नेमकाच एका मोठ्या अपघाताला सामोरे गेला आहे. जाणून घेऊया..
1983 चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देवने टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. पंतबद्दल कपिल देव म्हणाले की, “ऋषभ पंत लवकर बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि जेव्हा तो बरा होईल तेव्हा मी जाऊन आधी त्याच्या कानाखाली खेचेन. त्याच्या अपघाताने संपूर्ण संघाचे बॅलन्स बिघडले आहे. मला राग येतो की आजकाल तरुण खेळाडू अशा चुका का करतात? म्हणूनच मी त्याला नीट झाल्यावर मारणार आहे.”
कपिल देव म्हणाले, ‘ऋषभ पंतला आशीर्वाद आणि प्रेम. देव त्याला लवकर बरे करो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना उद्यापासून नागपुरात खेळवला जाणार आहे. पंतची अनुपस्थिती ही टीम इंडियासाठी मोठी हानी आहे, कारण पंत कसोटी फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट यष्टिरक्षक असण्यासोबतच एक अतिशय धोकादायक फलंदाज आहे. पंत हा कसोटी फॉरमॅटमध्ये झटपट धावा करणारा खेळाडू आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या महत्त्वाच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला त्याची उणीव भासेल.
ऋषभ पंतचा 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघात झाला होता. तो नवी दिल्लीहून त्याच्या मूळ गावी रुरकीला जात होता आणि त्याची मर्सिडीज कार चालवत होता. पंत याच्या कारने डेहराडून महामार्गावरील दुभाजकाला धडक दिली आणि आग लागली. 25 वर्षीय पंतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, गुडघ्याचा लिगामेंट फाटला आहे आणि त्याच्या उजव्या मनगटाला, घोट्याला आणि पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे. पंत आता दुखापतीतून सावरत आहे.
उद्यापासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका-
भारतीय संघ ऑस्ट्रेलियासोबतच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेला गुरुवारी 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार. 4 सामन्यांच्या या कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात होईल. मालिकेतील सलामीचा सामना नागपूरमध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघासाठी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या सामन्याला उद्या सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
(कसोटी मालिकेचे वेळापत्रक) :
पहिली कसोटी – 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी – 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी कसोटी – 1 ते 5 मार्च, धर्मशाला
चौथी कसोटी – 9 ते 13 मार्च, अहमदाबाद