निवडून आल्यावर अमोल कोल्हे यांनी चाहत्याला नारायणगाव येथे बोलावून दिल्या स्वतःच्या चपला

चाहते कधी काय करतील हे सांगता येत नाही. ‘अमोल कोल्हे जोपर्यंत खासदार होत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही”असा निर्धार लोकसभेच्या २ महिन्यांपुर्वी त्यांच्या एका वसमत तालुक्यातील चाहत्याने केला होता. वसमत तालुक्यातील धामणगाव येथील सदाशिव बेले याने हा निर्धार केला होता. मराठवाड्याच्या ४२-४५ डिग्री तापमानात अनवाणी पायांनी फिरणे ही गोष्ट सोपी नव्हती, त्याच्या पायला जखमा झाल्या पण अमोल कोल्हेंवरच्या प्रेमापोटी त्याच्या कडून ते घडून गेले.गावातील अनेक लोक त्याची चेष्टा करतं होते पण तो सर्वांना एकचं सांगत होता कि,”माझ्या संभाजी महाराजांना ज्या कलम कसायांनी इतिहासात बदनाम करन्याच काम केलं त्याला पुसून खरा इतिहास जनतेपुढे माडूंन लहानांपासून-थोरांपर्यंत पोहचवन्याच्या त्याच्या कामावर प्रभावीत होवून मी असं करतोय”
२३ मे रोजी अमोल कोल्हे खासदार झाले तेव्हा धामनगाव ह्या त्याच्या गावी सदाशिवची फटाक्याच्या आतेषबाजीत,गुलाल,हार-तुऱ्यांसहीत जंगी मिरवणूक त्याचा मित्रांनी काढली.मग हि सारी कहाणी अमोल कोल्हेंपर्यंत पोहचवणं महत्वाच होतं. डॉ. कोल्हे यांच्या विजयानंतर धामणगाव येथे ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला व बेले यांना पेढे भरून अभिनंदन केले. काही उत्साही कार्यकर्त्यांनी हे फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल केले हा सर्व प्रकार खा. कोल्हे यांना समजल्यानंतर त्यांनी बेले यांना नारायणगाव येथे बोलावून घेतले.नारायणगाव येथे ३० मे रोजी सदाशिव बेले व त्याचा मित्र दर्शन बेले गेले असता खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या चाहत्यांचा आदर सत्कार केला आणि स्वतःच्या पायातील कोल्हापुरी चप्पल काढून दिली सोबतच त्याला पेढा भरवत, व प्रेमपुर्ण अलिंगन देत त्याचा यथोचीत सन्मान केला व त्याचे आभार मानले. सदाशिव बेले हे मिळालेली भेट घेऊन वसमत येथे परतले. त्यांचा आनंद गगनाला मावेनासा झाला.
अमोल कोल्हे यांनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत साकारलेली संभाजी राजेंची भूमिका महाराष्ट्रातील घराघरात पोहचली. अमोल कोल्हे हे शिवसेनेचे नेते होते. पण निवडणुकीच्या आधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयही मिळवला. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे तीन वेळेस खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला.