अंतराळातील तब्बल सात महिन्यांच्या प्रवासानंतर अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चे ‘प र्सिव्हरन्स’ हे आकाराने सर्वांत मोठे आणि अत्याधुनिक रोव्हर मंगळावर उतरलं आहे. सहा चाकं असणारा हा रोव्हर आता पुढची दोन वर्षं मंगळावरचे दगड आणि पृष्ठभाग खणत इथे पूर्वी कधी जी वसृष्टी होती का, याचा शोध घेईल.
३० जुलै २०२० रोजी ‘मंगळ-२०२०’ या मोहिमेला सुरुवात झाली होती. अमेरिकेच्या फ्लोरिडातील केप कॅनव्हारल येथील प्रक्षेपण केंद्रावरून हे यान अवकाशामध्ये झेपावले होते. हे रोव्हर पृथ्वीपासून ४७२ दशलक्ष किलोमीटर अंतरावर पोचल्यानंतर ते मंगळाच्या पृष्ठभागावर असलेल्या एका मोठ्या विवरात सुरक्षितपणे उतरले, असे नासाने म्हटले आहे.
नासाने मंगळावर उतरवलेला एक टन वजनाचा हा दुसरा रोव्हर आहे. २०१२ मध्ये क्युरिऑसिटी नावाचा रोव्हर एका वेगळ्या विवरात उतरवण्यात आला होता. दरम्यान या नासा मोहिमेत भारतीय वंशाच्या डॉक्टर स्वाती यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
डॉ. स्वाती यांना जाते या मोहिमेचे मोठे श्रेय-
नासाची हि मंगळमोहिम २०३ दिवसांची होती. अतिशय आव्हानात्मक या मोहिमेत या रोबोटिक रोव्हरने ७ महिन्यात ४७ कोटी किलोमीटरचा प्रवास केला. ज्यावेळी हे रोव्हर मंगळावर लँड झालं त्यावेळी नासाच्या मिशन कंट्रोल रूममध्ये जल्लोष झाला.
या रोव्हरच्या लॅण्डिंगमध्ये शेवटचे ७ मिनिटं श्वास रोखून ठेवणारे होते. कारण शेवटच्या ७ मिनिटामध्ये रोव्हरचा वेग शून्यावर आणणे गरजेचे होते. वेग शून्यावर आल्यानंतर से फ लँ डिंग होणार होते. यात मोलाचा वाटा होता भारतीय वंशाच्या अमेरिकन संशोधक डॉ स्वाती मोहन यांचा. त्यांनी हे यान मंगळावर उतरवण्याच्या पथकाच्या प्रमुख म्हणून काम पाहिलं.
यान मंगळावार उतरल्याचे घोषणा सर्वप्रथम स्वाती यांनीच केली. अवघ्या १ वर्षाच्या असताना स्वाती या भारतातून अमेरिकेत गेल्या होत्या. त्यांचे बालपण हे वाशिंग्टन डीसीच्या उत्तर व्हर्जेनिया भागात गेले. ९ व्या वर्षी बघितलेल्या स्टार ट्रेक या मालिकेतील अनेक दृश्यांनी त्या भारावून गेल्या. पृथ्वीबाहेर असलेल्या सुंदर जगाची त्यांना जाणीव झाली.
अवकाश संशोधन क्षेत्राबरोबर त्यांना वैद्यकीय क्षेत्राची आवड होती. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांना बालरो ग तज्ज्ञ व्हावे असे वाटले. शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी भौतिक शास्त्र हा विषय निवडला. त्यांचा अभ्यास बघून त्यांना शिक्षकांनी इंजीनियरिंगकडे वळण्याचा सल्ला दिला. डॉ स्वाती यांनी मेकॅनिकल अँड एरोस्पेस इंजीनियरिंगची डिग्री घेतलेली आहे. त्यानंतर त्यांनी एम एस आणि पीचडी देखील केली.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.