मनोरंजन

‘दृश्यम २’साठी अजय देवगणने घेतले ‘इतके’ कोटी मानधन; आकडा वाचून थक्क व्हाल

अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या दोन्ही दिवसांत या दृश्यम 2 ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ‘दृश्यम 2’ च्या ओपनिंग कमाईबद्दल बोलायचे झाले तर ती जवळपास 15 कोटी रुपये होती. अशाप्रकारे चित्रपटाने दोन दिवसांत एकूण 36 कोटींची कमाई केली आहे. ‘दृश्यम’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी 5 कोटींहून अधिकची ओपनिंग केली होती.

बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशीही धमाका

एका ट्विटवर माहिती शेअर करताना ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सांगितले की, अजय देवगणच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी २१.५९ कोटींची कमाई केली आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई 36.97 कोटींवर गेली आहे. तब्बू आणि अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 15.38 कोटींचा व्यवसाय केला. अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ बद्दल बोलले जात आहे की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई करू शकतो.

चित्रपटाच्या कथेप्रमाणे या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयानेही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. रिलीज होण्याआधीच या चित्रपटाने नवे रेकॉर्ड बनवायला सुरुवात केली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही तो प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यात यशस्वी झाला आहे. आता अशाप्रकारे या चित्रपटात विजय साळगावकर यांची प्रमुख भूमिका असलेला अभिनेता अजय देवगणला मिळणाऱ्या मानधनाचा आकडा समोर आला आहे.

या चित्रपटात अजयने विजय साळगावकर यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तो आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी कोणत्याही थराला जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी 50 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र आता अजयने त्यातील निम्म्याहून अधिक रक्कम घेतल्याचे समोर आले आहे.

‘दृश्यम’ चित्रपटाच्या पहिल्या भागात अजयने साकारलेली विजय साळगावकर यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटातील अजयच्या कामाचेही खूप कौतुक झाले होते. आता पुन्हा एकदा तो त्याच व्यक्तिरेखेत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दृष्यम 2 मध्ये विजय साळगावकरची भूमिका साकारण्यासाठी अजयने 30 कोटी रुपये घेतले आहेत. हे मानधन चित्रपटातील इतर कलाकारांच्या मानधनापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.

‘दृश्यम’ चित्रपटाच्या या सिक्वेलसाठी प्रेक्षक खूप उत्सुक होते. ‘दृश्यम’ हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या रोमांचक कथेने सर्वांना मंत्रमुग्ध केले. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची यशस्वी रनही सुरू झाली आहे.

दृष्यम 2 ची कथा काय आहे

‘दृश्यम’ हा मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. त्याची कथा अतिशय मनोरंजक आणि सस्पेन्सने भरलेली होती. अजय देवगण व्यतिरिक्त तब्बू, अक्षय खन्ना, श्रिया सरन, इशिता दत्ता, रजत कपूर आणि मृणाल जाधव या चित्रपटात आहेत.’दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ चित्रपटाची कथा विजय साळगावकर आणि त्यांच्या कुटुंबावर आधारित आहे. आपल्या कुटुंबाला पोलिसांपासून वाचवण्यासाठी विजय कसा विविध प्लॅनिंग करतो, हे चित्रपटात अतिशय रोमांचकारी पद्धतीने दाखवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button