४ दिवसात २०० कोटींची कमाई केली तरीही पठाण फ्लॉप? समोर आलंय मोठं कारण

बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खानचा लोकप्रिय चित्रपट ‘पठाण’ सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन चार दिवस झाले असले तरी चाहत्यांमध्ये शाहरुख आणि त्याच्या चित्रपटाची क्रेझ अजूनही जोरात आहे. रिलीजच्या चौथ्या दिवशी हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
‘पठाण’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 55 कोटींची कमाई करून अनेक विक्रम केले आहेत. आता पहिल्या वीकेंडपूर्वीच हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, ‘पठाण’ने रिलीजच्या चौथ्या दिवशी 50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता रिलीजच्या पाचव्या दिवशी हा चित्रपट वीकेंडला किती कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच हा चित्रपट 300 कोटींचा टप्पा पार करेल.
वर्षाच्या सुरुवातीलाच शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस दाखवले आहेत. अशा परिस्थितीत हे वर्ष बॉलिवूडसाठी नक्कीच आनंदाचे असणार आहे. ‘पठाण’ने पहिल्या दिवशी 55 कोटी, दुसऱ्या दिवशी 68 कोटी, तिसऱ्या दिवशी 38 कोटी आणि चौथ्या दिवशी 50 कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटाने आतापर्यंत 211 कोटींची कमाई केली आहे.
‘पठाण’ या चित्रपटाची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ होती. शाहरुख खान या चित्रपटाद्वारे चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत असून चित्रपटाचे जोरदार प्रमोशनही करत आहे. मात्र रिलीजपूर्वीच या चित्रपटावर जोरदार टीका झाली होती. हा चित्रपट वादात सापडल्यानंतर शाहरुखने चित्रपटाचे प्रमोशन थांबवले. मात्र आता हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आला असून चाहते टाळ्या वाजवून, शिट्ट्या वाजवून आणि ओरडत चित्रपटाचा आनंद घेत आहेत. शाहरुखवर मोठे लेख लिहित आहेत. असे असले तरी एवढे कोटी कमावुनही पठाण फ्लॉप ठरला असं बोललं जात आहे. जाणून घेऊया काय आहे कारण..
कमाई करूनही पठाण फ्लॉप?
पहिल्याच दिवशी पठाण ने सगळ्यांचे रेकॉर्ड मोडीत काढले. पठाण ने जगभरातुन १०० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी पठाण १०० कोटी क्लब मध्ये दाखल झालाय. असं जरी असलं तरी पठाण फ्लॉप झालाय अशा चर्चा सुरु झालायेत.
सभी सनातनी भाइयों की एकता से #फ्लॉप_हुई_पठान pic.twitter.com/3H1RISCAhx
— Neeraj Partap (@nagrahari295) January 26, 2023
ट्विटरवर #फ्लॉप_हुई_पठान हा ट्रेंड व्हायरल झालाय. तब्बल ६७ हजारपेक्षा जास्त लोकांनी हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर ट्विट केलंय. काय झालंय नेमकं असं.. IMDB हि जगभरातल्या सिनेमांची रेटिंग करते. IMDB वर पठाणला सध्या ७.१/१० इतकं रेटिंग आहे. हेच रेटिंग कालपर्यंत ६ वर गेलं होतं. बहुतेक प्रेक्षकांनी पठाणला १ रेटिंग सुद्धा दिलंय. एकूणच सिनेमा मसाला एंटरटेनमेंट असला तरीही बहुतेक प्रेक्षकांना पठाण तितकासा आवडत नाहीये.
भारतीय RAW एजेंट विलेन है… खुद को भारत मां का आशिक बताता है…
पाकिस्तानी ISI एजेंट हीरोइन है, जो भारत की रक्षा कर रही है…
अफगानी पठान भारत की रक्षा कर रहा है… और क्या चाहिए यार… देश के गद्दार तो देखेंगे ही ना… #फ्लॉप_हुई_पठान pic.twitter.com/s0uq0SMW2T— Ach AnkurArya (@ACH_ANKURARYA) January 26, 2023
दुसरीकडे ट्विटर वर अनेक ठिकाणच्या थेटरबाहेरचे व्हिडिओ आणि फोटो बाहेर आलेत. प्रेक्षकांच्या पठाण पाहिल्यानंतरच्या रिऍक्शन्स व्हायरल होत आहेत. सिनेमा पाहून आल्यानंतर काही प्रेक्षक सिनेमावर नाराज आहेत. याशिवाय पटना, इंदौर, लखनउ, दिल्ली, विमान नगर अशा अनेक ठिकाणी थेटर ओस पडले आहेत. फक्त पाच सहा लोकांच्या उपस्थितीत थेटरमध्ये शो सुरु आहेत. अजूनही काही थेटरबाहेर संघटना पठाणला विरोध करत आहेत.
अशाप्रकारे बॉक्स ऑफिसवर जरी पठाणने बक्कळ कमाई केली असली तरी प्रेक्षकांना सिनेमा न आवडल्याने आणि काही ठिकाणी प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद असल्याने पठाण फ्लॉप होण्याची शक्यता जास्त वाटतेय. नुकताच पठाण २०० कोटी क्लब मध्ये दाखल झालाय. पठाण भारतातला पहिला सिनेमा ठरलाय जो इतक्या कमी वेळात १०० कोटी क्लब मध्ये दाखल झालाय.