Breaking News
Loading...
Home / प्रेरणादायी / तहसील क्लार्क, तमाशातील कलावंत ते विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विषयी राहुल आहेर यांचा लेख..

तहसील क्लार्क, तमाशातील कलावंत ते विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विषयी राहुल आहेर यांचा लेख..

नरहरी झिरवाळ हे मागील काही दिवसापासून चर्चेत असलेले नाव, मागे शेतात काम करताना त्यांचे काही फोटो वायरल झाले आणि महाराष्ट्राचे लक्ष त्यांच्या कडे गेले. परत आता नरहरी झिरवाळ यांची विधानसभा उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी राहुल आहेर यांनी लिहलेला हा लेख,

तहसील कार्यालयात क्लार्क, पण तिथंही रमू न लागल्याने नाशिकला जाऊन बिगारीच काम केलं परत गावाकडे जाऊन शेती आणि शेतीसोबत तत्कालीन खा.हरीभाऊ महाले यांच्या नेतृत्वाखाली राजकारणाला केलेली सुरवात, १५ वर्षे सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती पुढे जाऊन २००४ ला आमदार, आता तिसऱ्यांदा विधानसभा.

Loading...

साधा पायजमा पेहराव, डोक्यावर टोपी आणि ग्रामीण बाज बोलीभाषा अशी सर्वसाधारण ओळख. शेतात बांधावर तर कधी आदीवासी बांधवांसोबत.

झिरवाळ साहेबांनी राजकारणात येण्यापूर्वी तमाशा मध्ये पण काही काळ काम केलंय. त्यांनी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वळण पाणी योजना या आमच्या दिंडोरी पेठ तालुक्यात आणून शेतीचा विकास केला आहे. जिथे कॅनॉलचे पाणी नाही दुर्गम आदिवासी भागात तिथे पाझर तलावांचे काम केलेय, जलसंपदा विभागविषयी प्रचंड अभ्यास आहे हे विशेष. प्रचंड जनसंपर्क आणि ३ वेळेचे आमदार असूनही कोणताही बडेजाव त्यांच्याकडून दिसून येत नाही.

सर्वसामान्य माणसातून प्रचंड संघर्ष करत इथंवर आलेल्या आदिवासी पाड्यातील आमदार श्री नरहरी झिरवाळ यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

या निवडीचा आदिवासी भागातील विकासासाठी मोठा हातभार लागेल असा विश्वास आहे.

राहुल आहेर

वरील माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती आम्हाला पाठविण्यासाठी info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवा.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *