आरोग्य

डास आणि माशा घरातून पळवून लावण्याचे घरघुती उपाय

आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला घाण, केरकचरा, पाण्याची डबकी आणि धूळ असेल तर त्यातून डास आणि घरमाशांची पैदास वाढते. पावसाळ्यात तर या सगळ्या गोष्टींची खूपच काळजी घ्यावी लागते, कारण पावसाळ्यात पाणी साठल्यामुळे डबकी तयार होतात. परिणामी घरात डास आणि घरमाशा होतात. त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे आजार घरात येतात. काही घरघुती उपायांनी डास आणि घरमाशा पळवून लावता येतात. जाणून घेऊया त्याबद्दलचे काही उपाय…डास आणि घरमाशा पळवून लावण्याचे घरघुती उपाय ,१) कापूर – डासांना पळवून लावण्यासाठी लोक बहुदा मच्छर अगरबत्तीचा वापर करतात. पण अशी कॉईल जाळण्यापेक्षा आपण कापूरही वापरू शकतो. घरातील डास आणि घरमाशा पळवून लावण्यासाठी हा खूप सोपा आणि प्रभावी उपाय आहे. घरात १५ ते २० मिनिटे कापूर जाळून फिरवल्यानंतर त्याच्या वासाने घरातील डास आणि माशा दूर पळून जातील. २) तुळस – तुळस आपल्या सर्वांच्या घरी असते. तुळशीच्या वासापासून डास दूर राहतात. आपल्या घरी तुळस नसेल तर ती लावून आपण डासांना दूर ठेवू शकता. त्याशिवाय झेंडूच्या वासानेही डास दूर पळत असल्याने घरी झेंडूची झाडे असावीत.

३) कडुनिंब – कडुनिंबाच्या झाडात असणाऱ्या गुणांमुळे त्याला देशी दवाखाना असेही म्हणले जाते. खोबरेल तेलात कडुनिंबाच्या पानांचा रस टाकून तयार झालेले मिश्रण अंगाला चोळले की डास जवळ येत नाहीत. या मिश्रणाचा प्रभाव ८ तासांपर्यंत टिकून राहतो. त्यासोबतच दोन चमचे लिंबाच्या रसात ३ चमचे निलगिरीचे तेल टाकून तयार केलेले मिश्रण शरीराला चोळल्यावरही डास आणि माशा जवळ येत नाहीत. ४) लवंग आणि ओवा – घरमाशांना लवंगाचे फार वावगे असते. त्यामुळे लवंगाचे तेल आणि लवंग पावडर सगळ्या प्रकारच्या घरमाशांना घरातून पळवून लावण्याचा रामबाण उपाय आहे. त्याचप्रमाणे ओव्याची पावडर डासांना पळवून लावण्याचा प्रभावी उपाय आहे. डासांच्या उत्पत्तिस्थानांवर ओव्याची पावडर टाकल्यास डास तिकडून पळून जातात.

५) लसूण – लसणाच्या कुड्या सोलून घराच्या कोपऱ्यांमध्ये आणि जिथे डास लपून बसतात अशा ठिकाणी ठेवाव्यात. त्याच्या वासामुळे डास घराच्या जवळही फिरकत नाहीत. तुम्हाला हवे तर लसणाच्या पाकळ्या बारीक करून त्याचा रस घरात शिंपडू शकता. ६) दूध आणि चहा पावडरसोबत मिरे – घरातील माशा पळवून लावण्याचा हा एक प्राचीन उपाय आहे. अर्धा लिटर दूध गरम करून त्यात एक चतुर्थांश साखर टाका. त्यानंतर त्यात चार चमचे मिरे टाका. १५ मिनिटे दूध गरम करा आणि थंड झाल्यानंतर ते उथळ भांड्यात घ्या. त्यानंतर हे भांडे आपण घराच्या ज्या भागात माशा जास्त आहेत तिकडे ठेवू शकता. माशा त्या दुधाकडे आकर्षित होतात आणि त्यात बुडून मरतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button