Breaking News
Home / बातम्या / टाटाच्या 8 रुपयांच्या’ या’ शेअरनं तुम्हाला वर्षात बनवलं असतं करोडपती, केली छप्परफाड कमाई

टाटाच्या 8 रुपयांच्या’ या’ शेअरनं तुम्हाला वर्षात बनवलं असतं करोडपती, केली छप्परफाड कमाई

टाटा समूहाची कंपनी TTML म्हणजेच Tata Teleservices (Maharashtra) Limited ने आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात शेअरची किंमत 7.95 रुपयांवरून 171.55 रुपयांवर गेली आहे. म्हणजेच भाव 2157 टक्क्यांनी वाढले आहे.

गेल्या वर्षी 15 डिसेंबर रोजी NSI वर शेअर 7.95 रुपयांवर बंद झाला. मात्र, गेल्या काही दिवसांत या शेअरवर 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागत आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची छप्परफ़ाड कमाई होताना दिसत आहे.

TTML ही Tata Teleservices ची उपकंपनी आहे. कंपनी तिच्या विभागात मार्केट लीडर आहे. ही कंपनी व्हॉईस, डेटा सेवा पुरवते. या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठी नावे आहेत.

मार्केट इनसाइडर्सच्या मते, कंपनीने गेल्या महिन्यात कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा सुरू केली. ही सेवा कंपन्यांना वेगवान इंटरनेट, क्लाउड-आधारित सुरक्षा सेवा आणि सानुकूलित नियंत्रणे देखील प्रदान करते. परिणामी सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

क्लाउड-आधारित सुरक्षा हे या सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, त्यामुळे डेटा सुरक्षित ठेवता येतो. डिजिटल आधारावर चालणाऱ्या व्यवसायांना या लीज लाइनचा खूप फायदा होईल. हे सर्व प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून संरक्षण प्रदान करते. यासोबतच जलद इंटरनेट सुविधाही देण्यात आली आहे.

सप्टेंबर 2021 पर्यंत, टाटा समूहाच्या कंपन्यांकडे TTML मध्ये 74.36 टक्के हिस्सा होता. या समभागात टाटा टेलिसर्व्हिसेसचा 74.36 टक्के हिस्सा आहे. त्यापाठोपाठ टाटा सन्स 19.58 टक्के आणि टाटा पॉवर 6.48 टक्के आहे. याशिवाय वैयक्तिकरित्या, TTML मध्ये 23.22 टक्के शेअर्स ठेवण्यात आले. तुम्ही वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये ५ लाख गुंतवणूक केली असती तर आज तुम्ही करोडपती बनला असतात.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published.