ज्याला भाऊ म्हणाली त्याच्यासोबतच केलं स्वरा भास्करने लग्न, भाऊ म्हणलेले हे जुने ट्विट होत आहे व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने लग्न केलेआहे. त्यामुळे तिचे चाहते उत्साहित झाले आहेत, तर काहींनी हे कधी, कुठे आणि कसे घडले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. खरे तर या लग्नाची कोणालाच माहिती नव्हती. तिने समाजवादी पक्षाचे नेते आणि मुंबई TISS चे माजी सरचिटणीस फहाद अहमद यांची जीवनसाथी म्हणून निवड केली आहे. आता स्वराने स्वतः एक व्हिडिओ शेअर करून तिच्या लग्नाची बातमी उघड केली आहे आणि तिची प्रेमकहाणीही सर्वांना सांगितली आहे.
2019 मध्ये झाली पहिली भेट
स्वरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि आता तिने एका पोस्टद्वारे फहादसोबतच्या तिच्या भेटीबद्दल आणि प्रेमकथेबद्दल बरेच काही सांगितले आहे. 2019 मध्ये एका प्रोटेस्ट दरम्यान दोघे पहिल्यांदा भेटले होते. यानंतर त्यांच्यातील संवाद वाढला, तर फहादने स्वराला त्याच्या बहिणीच्या लग्नात बोलावले होते, पण शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने स्वरा या लग्नाला उपस्थित राहू शकली नाही, मात्र तिने फहादच्या लग्नाला नक्की हजर राहण्याचे आश्वासन दिले होते. तेव्हा कोणास ठाऊक होते की एके दिवशी तीच फहाद ची वधू बनेल.
दोघांनी कोर्ट मॅरेज केले
ना हायफाय फंक्शन ना कुठला गोंगाट, पण स्वराने अगदी साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज केले आहे. सोशल मीडियावर एक फोटो प्रसिद्ध झाला आहे, ज्यामध्ये स्वरा माहून साडी नेसलेली, टिका लावलेली आणि गळ्यात माळ घातली आहे. तिने फहादचा हात धरला आहे. त्याचवेळी फहादने पांढऱ्या कुर्त्यावर माहून नेहरू जॅकेट घातलेले दिसत आहे. दोघांनी ६ जानेवारी रोजी न्यायालयात कागदपत्रे सादर केली होती. बॉलीवूड अभिनेत्री स्वरा देखील सामाजिक समस्यांशी खूप संबंधित आहे.
स्वरा भास्कर शेवटची ‘जहां चार यार’ चित्रपटात दिसली होती
अनेक जण त्यांचे अभिनंदन करत आहेत. याआधी तिने एका व्यक्तीच्या हातात डोके ठेवून छायाचित्रे टाकली होती. स्वरा भास्कर शेवटची ‘जहां चार यार’ चित्रपटात दिसली होती. तीच्याशिवाय यात पूजा चोप्रा देखील दिसली होती. हा चित्रपट 16 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. फहाद अहमद हा महाराष्ट्र राज्यातील समाजवादी पक्षाच्या युवा शाखेचा नेता आहे. तर, स्वरा भास्कर ही चित्रपट अभिनेत्री आहे. दोघांचा हा प्रेमविवाह आहे.
भाई म्हणलेले जुने ट्विट व्हायरल-
दरम्यान स्वरा भास्करचे एक जुने ट्विट व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने पती झालेल्या फाहाद अहमद ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. यामध्ये तिने फाहाद चा भाई असा उल्लेख केलेला आहे. हाच धागा पकडून तिला अनेकजण सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. दरम्यान आता लव्ह जिहाद म्हणूनही दोघांवर टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे.