Breaking News
Loading...
Home / बातम्या / ज्यांना म्हंटलं जाऊ लागलं ठाण्याचे बाळ ठाकरे ते आनंद दिघे नेमके कोण होते?

ज्यांना म्हंटलं जाऊ लागलं ठाण्याचे बाळ ठाकरे ते आनंद दिघे नेमके कोण होते?

सध्या नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात संघर्ष बघायला मिळत आहे. यापूर्वी स्वर्गीय आनंद दिघे यांच्या मृत्यूवर निलेश राणे यांनी भाष्य करत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. हे आरोप शिवसेनेने पूर्णतः फेटाळून लावले होते.

यानंतर आता सध्या सुरु असलेल्या संघर्षामध्ये देखील आनंद दिघे नेमके कोण होते ? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. असे म्हणतात की आनंद दिघे हयात असताना ते ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे झाले होते. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे ते शिवसेनेत वरचढ होतील असा अंदाज अनेकांनी बांधला होता. आणि त्या कारणावरूनच त्यांचा मृत्यू झाला असं निलेश राणे यांनी म्हटलं होतं.

Loading...

आनंद दिघे यांचं पूर्ण नाव होत आनंद चिंतामण दिघे असं होतं. २७ जानेवारी १९५२ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचं घर ठाण्यातील टेंम्भीनाका परिसरात होतं आणि आजही त्यांच्या मृत्यपश्चात त्यांचं टेंभीनाका परिसरात मंदिर बांधलेलं आहे. त्यांच्या कुटुंबात आई, बहीण, एक भाऊ असा गोतावळा होता.

टेंम्भीनाका परिसरात त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या सभा होत असत. बाळासाहेंबाच्या हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन दिघेंनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी शिवसेनेसाठी आपलं जीवनच अर्पण केलं होत असं म्हणायला हरकत नाही. ते शिवसेनेच्या पक्ष कार्यालयातच झोपत असत. तसेच त्यांनी आपला घर संसार सोडून शिवसेनेचीच सेवा करायची असा सेवेचा विडा उचलला होता.

बाळासाहेबांनी त्यावेळी त्यांना जिल्हाप्रमुख पद दिले. जिल्हाप्रमुख झाल्यानंतर त्यांनी शिवसेना झपाट्याने वाढवली. शिवसेना जिल्हाप्रमुख असताना त्यांनी टेंम्भीनाका परिसरात आनंद आश्रम सुरु केला. या आश्रमात रोज जनता दरबार भरत असे. लोकं इथं रांगाच्या रांगा लावायचे. दिघे स्वतः लोकांच्या समस्या सोडवायचे आणि कधी कधी अधिकाऱ्यांना येथूनच दिघे साहेबांचा फोन जात असे.

Loading...

देवधर्माबाबत दिघे अत्यंत कडक होते. कल्याणच्या दुरबारी किल्यावर नमाजाच्या वेळी घंटा वाजवण्यास निर्बंध घालण्यात आले होते. त्याविरोधात मोठं आंदोलन दिघेंनी केलं. नाकापेक्षा मोती जड झाला आहे अशी भावना अनेकांनी शिवसेना प्रमुखांच्या कानावर घातली होती असं जेष्ठ पत्रकार सांगतात.

आनंदच्या पक्षनिष्ठेवर मला तिळमात्र शंका नाही असं देखील बाळासाहेब नेहमी म्हणायचे. दिघेंच्या प्रस्थाबाबत एका मासिकामध्ये ते ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे झाले आहेत असं छापून आलं होतं. ठाण्यात शिवसेनेचा महापौर करण्यासाठी आनंद दिघेंनी प्रण केले होते. मात्र शिवसेनेत फूट पडली आणि महापौर पद शिवसेनेच्या हातातून निसटले.

त्यानंतर काही दिवसांत पक्षाविरुद्ध काम करणाऱ्या श्रीधर खोपकर यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आनंद दिघेंना अटक करण्यात आली होती. नंतर काही दिवसांतच त्यांचा जामीनही झाला. यानंतर ठाण्यात कोणताही वाद झाली तरी तुझा खोपकर करू का ? अशी धमकी दिली जायची.

२४ ऑगस्ट २००१च्या पहाटे सकाळी ग्रामीण भागातून येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि पायाला जखम झाली. त्यानंतर दिघेंना हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी हॉस्पिटल पेटून दिले. २०० खाटांचे हॉस्पिटल काही वेळातच बेचिराख झाले.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *