Breaking News
Loading...
Home / बातम्या / जेव्हा राजकीय चातुर्य दाखवत राज्यपालांनी १२ सदस्यांची नावे केली होती मंजूर..

जेव्हा राजकीय चातुर्य दाखवत राज्यपालांनी १२ सदस्यांची नावे केली होती मंजूर..

महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून विधानपरिषदेवर १२ सदस्य नियुक्त केले जातात. सध्या केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि राज्यात महाविकास आघाडीची. राज्यपाल हे नेहमीच केंद्रात ज्या पक्षाची सत्ता असेल त्यांचाच मर्जीतले नेमवले जातात. भगतसिंह कोषारी हे सध्या महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.

अजूनही राज्यपालांनी महाराष्ट्रात विधपरिषद सदस्यांची निवड केलेली नाही आणि यावरून राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील असाच एक किस्सा यावरून आठवतो. केंद्रामध्ये २०१४ साली सत्ता पालट झाला आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. याआधी काँग्रेसचं सरकार होतं. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर काही काँग्रेस धार्जिण राज्यपालांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली.

Loading...

लोकसभा निवडणुकीनंतरच सहाच महिन्यात विधानसभेच्या निवडणूक येणार होत्या. २०१४ एप्रिल महिन्यात विधपरिषद जागा रिक्त झाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार असल्यानं ६-६ जागा वाटून घ्यायच्या असं ठरलं होतं. नावं लवकर घोषित करणं गरजेचं होतं.

केंद्रात मोदी सरकार आलं होतं आणि महाराष्ट्रातही हेच सरकार असं गणित त्यावेळी वाटतं असल्यानं राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोयीची खेळी करण्यासाठी उत्सुक होते. एप्रिल महिन्यात जशा जागा रिकाम्या झाल्या तसा काँग्रेस राष्ट्रवादीने पक्षस्रेष्ठींच्या सल्ल्याने आपापली नवे निश्तित करून थेट राज्यपालांना देण्यास सुरुवात केली.

तत्कालीन राज्यपाल के शंकर नारायण हे त्यावेळी राज्यपाल होते. आणि त्यांनी लगेचच ही नावं मंजूर केली. केंद्रातील सरकारकडून काही होण्याआधीच राज्यपालांनी ही नावे जाहीर केली आणि मंजूर केली. यामध्ये सुरुवातीला १० नवे मंजूर झाली आणि नंतर २ नावे मंजूर करण्यात आली.

Loading...

त्यानंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पक्षांची सत्ता आली. मात्र एक गोष्ट यामध्ये खूप काही सांगून गेली, ती म्हणजे राज्यपालांनी योग्य वेळी केलेली खेळी. राजकारणात पहिला वर कोण करतो आणि कोण जिंकत याला महत्व असतं आणि के. शंकर नारायण यांनी अत्यंत चारतुर्याने विधपरिषदेच्या १२ सदस्यांची नियमात बसवून नियुक्ती केली होती.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *