जुन्नरच्या ‘या’ तरुणाला तुम्हीही पाठवले असतील पैसे; त्याचे खरे रूप कळले तर येईल संताप

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्याचे फॅड मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. जुन्नर तालुक्यातील शिवभक्त म्हणून मिरवणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचे खरे रूप जनतेसमोर आले आहे. त्याचे अनेक कारनामे उघड झाले आहेत. एवढे होऊनच हे प्रकरण थांबलेले नाही तर आता त्याच्या अडचणीत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याचे पण दिसून आले आहे.
त्याला पोलिसांनी अटक केली आहे त्याला खंडणी मागणे आणि धमकवण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरुद्ध अनेक गोष्टी उघड होणार असल्याचे पण दिसून आले आहे. जुन्नर शिवसेना पक्षाच्या वतीने पण त्याच्या विरोधात निवेदन देण्यात आले आहे. शिवसेना पक्षाकडून त्याने केलेल्या फेसबुक लाईव्ह बद्दल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या तक्रारीमध्ये अक्षय बोऱ्हाडेवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्याला अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी पण करण्यात आले आहे. अक्षय बोऱ्हाडेवर जुन्न्नर शिवसेना पक्षाच्या वतीने नगरपालिका आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच नगराध्यक्षांची प्रतिमा मालिन केल्याचा प[न आरोप केला गेला आहे.
त्याच्यावर आता अनेक माध्यमांमधून आरोप केले जात आहेत. त्याचे अनेक कारनामे आता उघड पडणार असल्याचे पण दिसून आले आहे. त्याच्या पत्नीने पण अक्षय बोऱ्हाडे बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याची पत्नी रुपाली बोऱ्हाडे हिने अक्षयवर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत.
अक्षय बोऱ्हाडेंची बायको रुपालीने अतिशय धक्कादायक माहिती दिली आहे. रुपाली बोऱ्हाडेने सांगितले आहे की, तिची आणि अक्षयची ओळख सोशल मीडिया माध्यमातून झाली. त्यानंतर तिने जुन्नरला ऍडमिशन घेतले. तिकडे गेल्यानंतर त्या दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. नंतर अक्षयने तिला लग्नासाठी मागणी घातली आणि त्यांनी लग्न केले. लग्नानंतर मात्र रूपालीला अक्षयच्या सर्व करामती कळल्या आणि त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांनी अक्षयला अटक केली.