जया किशोरी यांच्यासोबत बागेश्वर बाबा करणार लग्न? लग्नाच्या चर्चेवर धीरेंद्र शास्त्रींनी सांगितलं कारण

आपल्या दिव्यदृष्टीने पाहिजे त्या गोष्टी ओळखतो दावा करणारे बाबा बागेश्वर सध्या खूपच चर्चेत आहेत. बागेश्वर बाबांनी नागपुरात येऊन दरबार भरवला. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष श्याम मानव यांनी त्यांना थेट चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान दिले. अंनीसच्या चॅलेंजनंतर प्रसिद्धीझोतात आलेले बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या लग्नाचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. मात्र, धीरेंद्र शास्त्री यांनी या चर्चेबद्दल स्पष्टच भाष्य केलं आहे.
झालं असं कि धीरेंद्र शर्मा हे सोशल मीडियात चर्चेत आल्यानंतर कथाकार आणि मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरीसोबत त्यांचे लग्न होणार आहे अशी बातमी मोठ्या प्रमाणात वायरल झाली. त्याचे मीम्सही व्हायरल होत आहेत. तिथून या चर्चांना सुरुवात झाली. पण, बाबांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या लग्नाच्या अफवा खोट्या आणि चुकीच्या आहेत. मी सध्या लग्नाचा विचार करत नाहीये. पण जेव्हाही मी लग्न करेन तेव्हा वाजत गाजत करेल असं त्यांनी म्हंटलं आहे.
धीरेंद्र शास्त्री यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मला अविवाहित राहण्याची इच्छा नाही. लोकांना यापुढे माझ्या चारित्र्यावर संशय येऊ नये म्हणून मी लग्न करणार आहे. मात्र, यावर अद्याप विचार झालेला नाही.
माझे आईवडील आणि गुरुजी माझ्या लग्नाचा निर्णय घेतील, मला बालाजीची परवानगी घ्यावी लागेल. ती आज्ञा मी घेतली आहे. त्यामुळे लग्न झाल्यावरमोठ्या धडाक्यात करून तुम्हाला नक्की सांगेल, असे धीरेंद्र शर्मा यांनी सांगितले.
बागेश्वर बाबांचा जन्म ४ जुलै १९९६ रोजी झाला. बागेश्वर बाबांचा जन्म छत्तरपूर जिल्ह्यातील गढा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामकृपाल गर्ग आणि आईचे नाव सरोज गर्ग आहे. धीरेंद्र शर्मा यांचे मूळ गाव बागेश्वर धाम आहे, जिथे त्यांचा दरबार भरतो. यासाठी अनेक गावातील भाविक दर्शनासाठी येतात. 27 वर्षीय धीरेंद्र शास्त्री सांगतात की, माझ्या लग्नाचा निर्णय माझे पालक घेतील.
जयकिशोरी यांच्यासोबत होणार लग्न?
दरम्यान, कथाकार जया किशोरी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. त्याचे अनेक व्हिडिओ इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर व्हायरल होत असतात. अध्यात्मिक कथा वाचणाऱ्या जया किशोरी तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्या लग्नाबाबत एक अट असल्याचेही जया किशोरी म्हणाल्या. एका प्रश्नावर जया किशोरी म्हणाल्या की, लग्नानंतर जो माझ्या आई-वडिलांना सोबत घेईल त्याच्याशीच मी लग्न करेन.
दरम्यान बागेश्वर बाबांसोबत लग्न होणार असल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण काहींनी या दोघांचं लग्न व्हावं अशी इच्छाही सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.