‘जग्गू आणि जुलिएट’मधील ‘भावी आमदार’ गाणं जोमात, काही क्षणातच ३४ लाख लोकांनी पाहिलं गाणं

अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांचा आगामी चित्रपट जग्गू आणि जुलिएट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ हा चित्रपट घोषित झाल्यापासूनच ट्रेंडमध्ये आहे. तसेच हा चित्रपट अजय-अतुल यांची म्युझिकल ट्रीट असल्याने यातील गाणीही लोकप्रिय होत आहेत. अशातच यातील नुकतंच रिलीज झालेलं आणि श्रीवल्ली फेम सिड श्रीरामने गायलेलं ‘कधी न तुला’ हे गाणं युट्युबवर तेराव्या क्रमांकाला ट्रेंडिंग होत आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर काही क्षणातच व्हायरल झाले. याच चित्रपटातील ‘भावी आमदार’ या गाण्याने 3४ लाख व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे.
‘कधी न तुला’ या गाण्यात जग्गू आणु जुलिएटला प्रेमाची जाणीव होऊन त्या प्रेमाच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची ओढ लागली आहे असं दिसतंय. एक हळुवार भावनेची गोष्ट सांगणारं हे गाणं आहे. अशातच या गण्याला सिडचा आवाज, गुरू ठाकूर यांचे शब्द आणि अजय-अतुल यांचं रमणीय संगीत यांमुळे चार चाँद लागले आहेत. तसेच या गाण्यात या दोघांसबत वाहणारी गंगा नदी आणि देवभूमी उत्तराखंडातील नयनरम्य दृश्य प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जाणारी आहेत. या सगळ्या जमून आलेल्या समीकरणामुळेच हे गाणं सध्या जोरदार ट्रेंड होतंय.
तर ‘जग्गू आणि जुलिएट’मधील ‘भावी आमदार’ हे सगळ्यांनाच थिरकायला लावणारं गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेलं दिसतंय. या गाण्याला यूट्यूबवर ३४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात उपेंद्र लिमये, अमेय वाघ, जयवंत वाडकर यांच्यासोबत संपूर्ण कोळीवाडा नाचताना दिसत आहे. अजय-अतुलच्या अफाट शब्दांमुळे आणि संगीतामुळे हे गाणे लोकप्रिय होत आहे. अतुलच्या आवाजाने गाण्यात जीव आला. मराठी गाणी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाहिली जातात ही मराठी रसिकांसाठी अभिमानाची बाब आहे. ‘जग्गू आणि जुलिएट’ हा चित्रपट उद्या १० फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बघा भावी आमदार गाणं-
गाणं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा.