तुम्ही चित्रपट रसिक असाल तर तुमचा आवडत्या अभिनेत्यांमध्ये एक नाव नक्कीच असेल. कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नसताना मेहनतीने आपले नाव बॉलीवूडमध्ये एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारा हा अभिनेता म्हणजे नवाझुद्दिन सिदिक्की. चला बघूया नवाझुद्दिन अभिनेता कसा झाला त्याची संघर्षमय कहाणी…९ भाऊ बहिणीत सर्वात मोठा नवाजुद्दिन याचा जन्म १९ मे १९७४ साली उत्तर प्रदेश मध्ये मुज्जफरनगर जिल्ह्यातील एक छोटेसे गाव बुढाना येथे झाला. त्यांचे संपूर्ण बालपण व प्राथमिक शिक्षण याच गावात पूर्ण झाले. अनेक लोकांना वाटत असेल कि नवाजूद्दीन हा एका गरीब कुटुंबातून आला असेल परंतु तसे काहीही नाही तो एका जमीनदार शेतकरी कुटुंबातील होता. नवाजूद्दीन ला लहानपणापासून शहराची ओढ लागली होती. कारण त्याला शिक्षण घ्यायचे होते व गावात शिक्षणाच्या सोई सुविध्या उपलब्ध नव्हत्या.
त्यामुळे पुढील शिक्षणाकरिता त्याने हरिद्वार येथे Gurukul Kangri Vishwavidyalaya मध्ये BSc Chemistry ला प्रवेश घेतला व शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने वडोदरा गुजरात येथील एका कंपनीत केमिस्टची नौकरी करण्यास सुरवात केली. परंतु त्याला या नौकरीत रस नव्हता एक दिवस अचानक त्याचा मित्र त्याला गुजराती नाटक दाखविण्यास घेऊन गेला. हेच आपल्याला करायचे आहे हे त्याने ठरविले. नवाजुद्दिन आपली नौकरी सोडून दिल्लीला प्रस्थान केले. तिथे हि रोज नाटके बघितली व अभिनय शिकायला National School of Drama (NSD) येथे प्रवेश घेण्याकरिता पर्यंत सुरु केले. इथे प्रवेशाकरिता अनुभव आवश्यक आहे त्या करिता त्याने Sakshi Theatre Group नावाच्या संचात काम करायला सुरवात केली यामध्ये त्यांच्या सोबत मनोज वाजपेयी , सौरभ शुक्ला हि सोबत होते.
सकाळ संध्याकाळ फक्त अभिनय तो करत राहिल व शिकत राहिला. १९९६ मध्ये त्याचे NSD मधील शिक्षण पूर्ण झाले.विजय राज व राजपाल यादव त्याच्या सोबतच येथून निघाले. NSD नंतर तो ४ वर्ष दिल्लीला राहिला. अनेक पथ नाट्य, नाटक इत्यादी मध्ये त्याने काम केले. परंतु या सर्वातून पैसा मिळत नव्हता. म्हणून त्याने ठरविले उपाशीच मारायचे आहे तर मुंबईला जाऊन मरुया. आणि २००० मध्ये ते मुंबई इथे आले. मुंबई येथील एका NSD मधील सिनियर ला त्याने मदत मागितली आणि तोही तयार झाला परंतु शर्तीवर कि त्याने स्वयंपाक बनवायचा.
आमीर खानचा चित्रपट सरफरोश मध्ये ४० सेकंदाचा रोल होता तो ज्यामध्ये एका छोट्या आरोपीस पकडून पोलीस चौकशी करतात. त्याने हा रोल स्वीकारला. आणि त्यानंतर अशेच छोटे रोल तो करत राहिला कधी वेटर कधी चोर कधी भिकारी. अनेक वर्ष निघून गेली नवाजूद्दीन ला मनासारखे काम मिळाले नाही. लोग त्याची खिल्ली उडवत म्हणत असे “आता डीसकवरी टीव्हीवर जनावरे हि दिसत आहे तू कधी दिसणार” त्यानंर सर्वाना मिळाला फैझल म्हणजेच गैंग ऑफ वासेपूर कहानी, गैंग्स ऑफ़ वासेपुर,तलाश, द लंचबॉक्स, किक, बदलापुर, बजरंगी भाईजान, मांझी ह्या सिनेमाने आता नवाजूद्दीन ला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या अभिनयाकरिता संपूर्ण जग वाहवाह करत आहे. नवाजुद्दिन सिद्दिकीच्या या २० वर्षाच्या संघर्षास खासरे तर्फे सलाम…